बऱ्याच लोकांनी लो शु ग्रीडची संकल्पना समजली नाही, पुन्हा सांगा म्हणून विनंती केली, त्यांच्या विनंतीला मान देऊन पूर्णपणे समजण्याकरता एक उदाहरण घेऊन समजावतो. पहिल्यांदा आकृती क्र. 1 बघा. यात 3×3 चे चौकोन आहेत आणि त्यात जे नंबर्स आहेत ते कायमस्वरूपी आहेत. त्यांचा क्रम, त्यांची जागा ही फिक्स आहे. ही आकृती बदलत नाही. आपल्या जन्म तारखेमध्ये जे जे नंबर्स आले आहेत ते त्या त्या ठिकाणी भरले की झाले. जे नंबर्स आपल्या जन्म तारखेत नाहीत ते भरायचे नाहीत. यालाच मिस्सिंग नंबर्स म्हणतात. इतके सोपे आहे. चला एक उदाहरण घेऊन समजाऊन घेऊ. लो शू ग्रीड विश्लेषण जन्मतारीख : 23 जून 1998
- जन्मतारीख: 23-06-1998: लो शू ग्रीड तयार करताना, आपण या जन्मतारीखमधील सर्व अंक वापरतो: = 2, 3, 0, 6, 1, 9, 9, 8.
4 9 2
3 5 7
8 1 6
लो शू ग्रीडमध्ये 1 ते 9 पर्यंतचे अंक एका 3×3 च्या चौकटीत ठरावीक स्थानावर असतात:
आकृती क्र. 1
आता आपण ग्रीडमध्ये दिलेले अंक कुठे कुठे आहेत हे पाहू: अंक 1-1 वेळा (मनाची ताकद),अंक 2-1 वेळा (भावना), अंक 3-1 वेळा (सर्जनशीलता/कम्युनिकेशन), अंक 4-नाही (शिस्त/गणितीय बुद्धी नाही), अंक 5-नाही (बॅलन्स नाही), अंक 6-1 वेळा (कौटुंबिक जबाबदारी), अंक 7- नाही (आध्यात्म/स्वतंत्रता नाही), अंक 8-1 वेळा (शिस्त/ध्येयाची पूर्तता), अंक 9-2 वेळा (उच्च विचार/कलात्मकता), अंक 0- हे आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक आहे, ग्रीडमध्ये मोजले जात नाही पण परिणाम असतो.
1.पंक्ती (Rदै) विश्लेषण: पहिली ओळ: 4-9-2-येथे 4 नाही, 9 आहे (2 वेळा), 2 आहे=कल्पकता+भावना आहेत, पण शिस्त नाही. निर्णय घेताना स्थिरता नसण्याची शक्मयता, कल्पनाशक्ती उत्तम.
- दुसरी ओळ: 3-5-7-3 आहे, पण 5 आणि 7 नाहीत=सर्जनशीलता आहे, पण आत्म-संवाद, समतोल, आणि आध्यात्मिक झुकाव थोडा कमी. विचार वेगवान, पण आतला आवाज दुर्लक्षित होतो.
3.तिसरी ओळ: 8-1-6-सगळे आकडे आहेत (8, 1, 6) ही पूर्ण ओळ आहे -एकमात्र पंक्ती जी पूर्ण आहे. साहस, विचारशक्ती आणि जबाबदारी यांचा समतोल आहे. ही रेषा व्यक्तीच्या यशाच्या मुख्य कारणांपैकी एक असते.
स्तंभ (Column) विश्लेषण:
1.पहिला स्तंभ: 4-3ा8-4 नाही, 3 आणि 8 आहेत=कठोर परिश्र्रम करण्याची क्षमता आहे पण शिस्त व कार्यपद्धतीत ढिलाई.
2.दुसरा स्तंभ: 9-5ा1-9 आणि 1 आहेत, 5 नाही=आत्मबळ आणि उच्चविचार आहेत पण मानसिक समतोल नाही.
3.तिसरा स्तंभ: 2-7ा6-2 आणि 6 आहेत, 7 नाही=भावना आणि जबाबदारी आहेत पण आध्यात्मिक किंवा स्वतंत्र निर्णय क्षमता कमी.
तिरक्या रेषा (Diagonal) विश्लेषण:?डावीकडून उजवीकडे (4-5-6): 4 आणि 5 नाहीत, 6 आहे=कौटुंबिक जीवनात जबाबदारी तर आहे पण त्यासाठी योग्य शिस्त व समतोल आवश्यक आहे.
?उजवीकडून डावीकडे (2-5-8): 2 आणि 8 आहेत, 5 नाही= भावनिक स्थैर्य आणि उद्दिष्टपूर्तीचा झुकाव आहे, पण मानसिक समतोल गरजेचा. 4. शून्याचा (0) प्रभाव: 0 म्हणजे ‘शून्य ऊर्जा’-पूर्वजन्माचे कर्म, आत्म्याची प्रवास स्थिती.=या व्यक्तीच्या आयुष्यात अधूनमधून गूढ अनुभव येऊ शकतात.
विशेष निरीक्षण: 5 चा अभाव: मनाचा आणि शरीराचा समतोल जपणे खूप गरजेचे आहे. ध्यानधारणा आवश्यक. 4 आणि 7 चा अभाव: अभ्यास, योजना, आणि आध्यात्मिक निर्णय यामध्ये त्रास होऊ शकतो. 9 चा दोनदा प्रभाव: जीवनात कला, कल्पकता, आणि सामाजिक कार्य याकडे झुकाव असेल.
मेष
या आठवड्यात तुमच्यावर मंगळाची कृपा राहील. कामात नवी संधी मिळेल. प्रलंबित प्रकल्प मार्गी लागतील. सहकारी वर्गाकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल. आरोग्य सुधारेल. मनोबल वाढेल. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. वाहनसुख संभवते. एखाद्या प्रवासाची योजना आखाल. जुने मित्र भेटतील. शिक्षणात यश मिळेल. नवे करार फायदेशीर ठरतील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद लाभतील. धार्मिक कामात सहभाग वाढेल. मन:शांती लाभेल.
उपाय: मंगळवारी हनुमान मंदिरात प्रसाद द्या.
वृषभ
शुक्र अनुकूल असल्यामुळे संबंधात प्रेम वाढेल. नवे संबंध निर्माण होतील. व्यवसायात नफा संभवतो. जोडीदाराशी गोडवा वाढेल. सौंदर्य व विलासी गोष्टींकडे ओढ राहील. घरगुती खर्च वाढेल, पण नियंत्रणात राहील. कामात स्थैर्य येईल. आरोग्य चांगले राहील. छुप्या शत्रूपासून सावध रहा. एखादी जुनी गोष्ट आनंद देईल. मनाकडून नवे निर्णय घेण्याचा मोह होईल. संयम राखा. कला, संगीत यामध्ये रस वाढेल. विद्यार्थी वर्गासाठी संधी. मानसिक स्थैर्य लाभेल. एखाद्या व्यक्तीकडून सल्ला घ्या. आध्यात्मिक विषयांकडे ओढ वाढेल.
उपाय: शुक्रवारी लक्ष्मीला कमळ फुल अर्पण करा.
मिथुन
बुधाचा प्रभाव राहील. विचारशक्ती तीव्र होईल. संवाद कौशल्य वाढेल. व्यवहार चतुराईने पार पडतील. बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. लेखन, वाचन, शिक्षण क्षेत्रात फायदा. नवीन संकल्पना मांडाल. प्रवासाची शक्मयता. घरात संवाद वाढवा. आर्थिक दृष्टीने स्थैर्य. भावंडांशी संबंध सुधारतील. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. मन:शांतीसाठी ध्यानधारणा करा. नवीन लोकांशी संपर्क होईल. जुन्या मित्रांची भेट. संधी ओळखा आणि कामाला लागा.
उपाय: बुधवारी गणपतीला 21 दूर्वा अर्पण करा.
कर्क
चंद्र प्रभावात असल्यामुळे भावनिक असाल. घर, आई व कुटुंब याकडे ओढ. नात्यांमध्ये भावनात्मक समजूत आवश्यक. आरोग्यावर विशेष लक्ष. काही निर्णय भावनेवर आधारित असू शकतात. घरात महिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. शांत राहणे गरजेचे. मनात थोडा अस्वस्थपणा. आर्थिक बाबतीत खर्चाचे नियोजन करा. एखादा जुना विषय पुन्हा उफाळू शकतो. विश्र्रांती घ्या. प्रवास टाळा. आत्मपरीक्षण करा. कुठलाही मोठा निर्णय पुढे ढकला.
उपाय: सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा.
सिंह
सूर्याच्या प्रभावाने आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. वरिष्ठांशी संबंध सुधारतील. नेतृत्व गुण दिसून येतील. कुटुंबात सन्मान मिळेल. सामाजिक स्तर उंचावेल. आरोग्य सुधारेल. उष्णतेमुळे त्रास संभवतो. आर्थिकदृष्टीने लाभदायक काल. सरकारी कामात यश मिळेल. काही लोक तुमच्या नेतृत्वाला पाठिंबा देतील. आध्यात्मिक पातळीवर प्रगती. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. मुलांशी संवाद करा. यश मिळवण्यासाठी चिकाटी गरजेची आहे.
उपाय: रविवारी सूर्याला जल अर्पण करा आणि आदित्यहृदय स्तोत्र पठण करा.
कन्या
कामात अचूक नियोजन कराल. कागदपत्रं, करार याबाबतीत दक्षता घ्या. आरोग्य चांगलं राहील, मात्र पाचनाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. मित्रपरिवारात सल्लागाराची भूमिका निभवाल. नव्या नोकरीच्या संधी मिळतील. प्रवासात फायदा होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. नात्यांमध्ये संवाद वाढवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश. आर्थिक कामात यश. महिलांसाठी सप्ताह फायदेशीर. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा. विचारपूर्वक निर्णय घ्या. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधाल. नवे कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल. वृद्धांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.
उपाय: बुधवारी गायीला हिरवं गवत खाऊ घाला.
तुला
शुक्राचा प्रभाव लाभदायक राहील. मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत नवीन संधी. घरात सजावट किंवा वस्तू खरेदीची शक्मयता. जोडीदाराशी रोमँटिक क्षण. कला, संगीत, अभिनय क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ. परदेशगमनाचा विचार होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहील. सौंदर्यप्रसाधनांच्या बाबतीत खर्च वाढेल. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. मानसिक शांती लाभेल. कोर्ट-कचेरीचे प्रŽ सोडवता येतील. कुटुंबातील महिलांचा सल्ला उपयुक्त. प्रेमसंबंध बहरतील.
उपाय: शुक्रवारी मां लक्ष्मीच्या चित्रासमोर गंधराज फुल वाहा.
वृश्चिक
मंगळ व केतूचा प्रभाव असल्याने मनात अस्वस्थता संभवते. काही अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. संयम आणि शांती गरजेची आहे. नोकरीत बदल किंवा ताण संभवतो. घरात वादविवाद टाळा. शारीरिक थकवा जाणवेल. गुप्तशत्रूंपासून सावध रहा. ध्यानधारणा फायदेशीर. जुने प्रŽ पुन्हा समोर येतील. वैवाहिक जीवनात गोडवा हवा. आहारावर नियंत्रण ठेवा. जोखीम न घेणेच हिताचे. आत्मपरीक्षण करा. आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक लोकांपासून दूर रहा. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
उपाय: मंगळवारी लाल कापडात मसूर डाळ बांधून हनुमान मंदिरात दान करा.
धनु
गुऊचा प्रभाव प्रबळ राहील. अध्यात्म, धर्म आणि शिक्षण या गोष्टींमध्ये रस वाढेल. अभ्यास, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना यश. नवे कौशल्य मिळवण्याची संधी. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर ठेवा. आर्थिक व्यवहार लाभदायक. धार्मिक प्रवासाची शक्मयता. आरोग्य उत्तम. नवे ज्ञान मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल. वाद विवादांपासून दूर रहा. कायदेशीर बाबतीत यश. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. नात्यांमध्ये विश्वास वाढवा. जोडीदाराच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.
उपाय: गुरुवारी गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा पेन वाटा.
मकर
शनीच्या प्रभावामुळे स्थैर्य आणि मेहनतीचा काळ. थोडा ताणतणाव संभवतो. कामात वेळ लागेल, पण यश निश्चित. वरिष्ठांचा विश्वास जिंकाल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदाराशी समजूत वाढवा. आर्थिक बाबतीत स्थैर्य. मनात थोडी चिंता संभवते, परंतु कर्मावर लक्ष केंद्रित करा. घरात वृद्धांची काळजी घ्या. व्यवसायात प्रगती. गुंतवणुकीत सतर्क राहा. उशिरा का होईना, पण यश मिळेल. कर्मावर विश्वास ठेवा.
उपाय: शनिवारी काळ्या कुत्र्याला रोटी खाऊ घाला.
कुंभ
या आठवड्यात कल्पकतेचा प्रभाव राहील. नवीन विचार सुचतील. समाजहितासाठी काम कराल. मित्रांमध्ये लोकप्रियता वाढेल. जोडीदाराकडून अपेक्षा पूर्ण होतील. खर्च वाढेल, परंतु योग्य नियोजन केल्यास त्रास होणार नाही. नवीन तंत्रज्ञान किंवा ऑनलाइन कामात प्रगती. मित्रांकडून मदत. प्रेमसंबंधासाठी अनुकूल काळ. मन प्रसन्न राहील. मानसिक समतोल राखा. प्रवास संभवतो. जुनी ओळख नवीन संधी आणेल.
उपाय: शनिवार संध्याकाळी दिवटीत मोहरीचे तेल घालून पिंपळाखाली दिवा लावा.
मीन
गुरु आणि नेपच्यूनचा प्रभाव तुमचे अंतर्ज्ञान वाढवेल. भावनिक राहाल. प्रेमात संवेदनशीलता वाढेल. आध्यात्मिक व धार्मिक झुकाव प्रबळ. गुऊवारी उपवास ठेवा. घरगुती प्रŽ सुटतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामामध्ये कल्पकता वापरा. तुमचे बोलणे इतरांवर प्रभाव टाकेल. जुने मित्र लाभदायक ठरतील. प्रेमसंबंध स्थिर राहतील. संधीचा लाभ घ्या. आत्मविश्वास वाढवा.
उपाय: गुरुवारी केशरचा तिलक लावा व वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या.





