09/02/2025
मेष
वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. कोणत्याही कामात संथपणे पण सातत्याने पुढे जाऊ शकाल. विविध गोष्टींचा आरंभाचे उपक्रम मनात येत आहेत. भावी काळातील काही बेत आखता येतील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरवता येतील. आर्थिक बाजू सावरता येईल. आपल्या विरोधकांना पुढे येऊ देऊ नका. खर्च वाढेल, कामाची दगदग होईल, वरिष्ठांची नाराजी ओढवून घेऊ नका.
विहिरीत दूध टाका.
वृषभ
गैरसमज टाळावा. जोडीदाराशी चांगले सहकार्य अपेक्षित आहे. आपल्या आरोग्याच्या तक्रारी राहणार नाहीत. उत्तम ग्रहस्थितीत कामकाजाचा उत्साह द्विगुणित होईल. सरकारी नियम, प्रकृतीस्वास्थ्य, चर्चासत्र याबाबत अतिशय सतर्क राहणेच हिताचे ठरणार आहे. कला, साहित्य, व्यापार, राजकारण अशा अनेक क्षेत्रात आपला प्रभाव राहील आणि चांगल्या घटनांचा आनंद मिळू शकेल.
दही दान द्या.
मिथुन
काही चांगल्या घटनांचा दीर्घकाळ टिकणारा अनुभव येईल. कला, साहित्य, व्यापार, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात आघाडीवर राहू शकाल. कौटुंबिक वातावरण दूषित होण्याची शक्मयता आहे. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष द्या. संयम व युक्तीचा वापर करा. प्रवासाचे बेत साध्य होतील. आर्थिक बाजू चांगली राहील. लेखकांना चांगले दिवस आहेत.
मुंग्यांना साखर घाला.
कर्क
वादविवाद व भांडणापासून दूर राहणेच योग्य राहील. सामाजिक क्षेत्रात आपली शान वाढेल. प्रवास कराल. अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. प्रतिष्ठा शाबूत ठेवता येईल. छोट्या-छोट्या संधीचा त्वरित उपयोग करून पुढे सरकण्याचा प्रयत्न करा. यशाचा मार्ग अवघड असला तरी नाराज न होता प्रयत्नशील व स्वयंसिद्ध होण्याचा मार्ग स्वीकारा. आरोग्य जपा.
स्मशानात नाणे टाका.
सिंह
आपल्याला अपेक्षित गोष्टी साध्य करणे शक्मय होईल. कला, साहित्य, व्यापार, जनसंपर्क अशा अनेक क्षेत्रांचा यात समावेश होऊ शकेल. प्रवासाचे योग येतील. प्रवास कार्यसाधक होईल. नवे परिचय, नवे उपक्रम यांचा लाभ घेता येईल. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारा. वादाचे प्रसंग टाळा. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रकृतीची पथ्ये पाळा.
छत्री दान द्या.
कन्या
या सप्ताहात पुढील काळाचा विचार करूनच आर्थिक योजनांचा मागोवा घ्या. आपली प्रतिष्ठा शाबूत राहील व लहान-सहान मिळणाऱ्या संधीतून उपक्रम सुरू ठेवणे शक्य होईल. आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवास बराचसा सुखदायी असेल. प्रलोभने टाळा. व्यवहारात सावध राहा. प्रकृतीची पथ्ये पाळा. कामाच्या ठिकाणी अकारण वाद होण्याची शक्यता आहे.
मजुरांना ताक वाटा.
तूळ
शुभकार्यात काही अडथळे येण्याची शक्मयता राहील. अशुभ काळ अधिक तीव्र होण्याची शक्मयता आहे. नियोजित उपक्रम, योजना यात अडथळे येऊ शकतात. त्यात विरोधकांचा ससेमिरा मागे लागल्याने मन दु:खी होण्याची शक्मयता आहे. अपयशाची झळ आपणास पोहोचणार नाही. मात्र व्यवसाय, नोकरी, सरकारी नियम याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या व प्रकृती स्वास्थ्य जपावे.
पाण्यात तीळ घालून आंघोळ करा.
वृश्चिक
गैरसमज टाळा. जोडीदाराशी चांगले संबंध ठेवा. अध्ययनात अडथळे येण्याची शक्मयता राहील. आपल्या दैनंदिन कार्यावर व व्यावहारिक गोष्टींवर परिणाम होईल. लहान-सहान संधीचा योग्य उपयोग करून आपल्याला पुढे सरकता येईल. कायदा व अधिकार यांचे कटाक्षाने पालन करा, प्रयत्नांची जोड देऊन आपले कार्य साध्य करा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.
मनगटावर 465 लिहा.
धनु
नातेसंबंध टिकविण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. विविध क्षेत्रात आपली छाप व प्रभाव पाडता येईल. कला, साहित्य, व्यापार, राजकारण अशा क्षेत्रांचा यात समावेश असेल. आपल्या कार्यात हुशारी, प्रयत्न, कल्पकता यांचा वापर करून आघाडीवर राहाल. मंगलकार्याचे योग ठरतील. राजकीय क्षेत्रात आपला जम बसवाल.
आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.
मकर
आपले आरोग्य चांगले राहील. फक्त खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. नव्या गोष्टी करण्याचा मानस राहील. आपली व्यावहारिक व सामाजिक प्रतिमा उंचावू लागेल. नोकरी, कला, व्यापार, राजकारण या क्षेत्रांचा यात समावेश होईल. बौद्धिक क्षेत्राला उत्तम वाव मिळेल. आर्थिक बाजू सावरता येईल. मंगलकार्ये ठरतील. प्रकृती सांभाळा.
लांबचा प्रवास टाळा.
कुंभ
प्रवासाचे बेत सार्थकी लागतील. आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू शकाल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. काही भाग्यवंतांना सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धीचे वलय प्राप्त होईल. बौद्धिक चुणूक दाखविण्याची संधी प्राप्त होईल. मुलांकडून अध्ययन क्षेत्रात सुवार्ता समजतील. स्पर्धा, साहस व प्रलोभनांपासून दूर रहा. प्रकृतीकडे अधिक लक्ष द्या.
कोरड्या विहिरीत 7 नाणी टाका.
मीन
डोकेदुखी, भाजणे याबाबत दक्ष रहा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कामासंबंधात यश मिळू शकेल. आपली बाजू मजबूत करा आणि प्रतिष्ठा सांभाळा. मोठ्या यशाच्या अपेक्षा ठेवणे योग्य होणार नाही. ज्या लहान-सहान संधी उपलब्ध होतील त्याचा योग्य उपयोग करून प्रयत्नशील रहा. प्रलोभने, आश्वासने टाळा आणि कायदा व नियमांचे पालन करा.
माश्यांना खाणे द्यावे.
वाहन घेण्यात अडचणी येत असतील किंवा असलेले वाहन खर्च करवत असेल तर एक लोटा पाण्यात 2 मोठ्या वेलच्या उकळून घ्या. पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा. नंतर हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळा आणि स्नान करा. याने वाहनासंबंधी प्रकरणात लाभ मिळेल.





