मेष
या आठवड्यात नवे विचार, नवे मार्ग आणि नवे दृष्टिकोन तुमच्या जीवनात उमलतील. तुमच्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवा. गुऊवारचा दिवस विशेष शुभ राहील. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा, यश निश्चित आहे.
उपाय: घराबाहेर पडताना गूळ खा आणि ‘ॐ नम: शिवाय’ अकरा वेळा जपा.
वृषभ
या आठवड्यात कुटुंब, प्रेम आणि आनंद यांचा सुखद अनुभव येईल. मनाला शांती मिळेल आणि नात्यांमध्ये अधिक सुसंवाद निर्माण होईल. रविवारी एखादी शुभ सुऊवात करा, चांगले परिणाम मिळतील.
उपाय: आईवडिलांचे आशीर्वाद घ्या आणि ‘ॐ श्रीरामाय नम:’ पाच वेळा जपा.
मिथुन
या आठवड्यात तुमची निर्णयक्षमता आणि स्पष्ट विचारशक्ती उपयुक्त ठरेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन प्रगतीची नवी दारे उघडतील. बुधवार विशेष अनुकूल असेल. आत्मविश्वास टिकवा.
उपाय: बुधवारच्या सकाळी तुळशीचे पान खा.
कर्क
या आठवड्यात शांतता, आत्मचिंतन आणि मन:शांतीचा अनुभव येईल. तुमच्या प्रŽांची उत्तरे तुम्हाला स्वत:मध्येच सापडतील. शनिवार तुमच्यासाठी विशेष शांतता देणारा असेल. स्वत:साठी वेळ द्या.
उपाय: शनिवारच्या संध्याकाळी दिवा लावा आणि ‘ॐ चंद्राय नम:’ सात वेळा जपा.
सिंह
या आठवड्यात नव्या सुऊवातींचा कालखंड खुला होईल. जुने अडथळे दूर होऊन नव्या ऊर्जेचा अनुभव येईल. मंगळवार प्रेरणादायी ठरेल. आत्मविश्वास वाढेल आणि प्रगती दिसेल.
उपाय: मंगळवारी लाल फुल अर्पण करा आणि ‘ॐ सूर्याय नम:’ नऊ वेळा जपा.
कन्या
या आठवड्यात मनातील जुन्या भावना आणि वेदना हलक्या होत जातील. नवी सुरुवात करण्यासाठी योग्य काळ आहे. शुक्रवार तुमच्यासाठी समाधान आणि शांती घेऊन येईल. मन मोकळे ठेवा.
उपाय: शुक्रवारी गोड अन्न वाटा आणि ‘ॐ श्रीलष्म्यै नम:’ पाच वेळा जपा.
तुला
या आठवड्यात कामांमध्ये वेग, चालना आणि सकारात्मक बदल दिसतील. नवी संधी मिळू शकते. सोमवारचा दिवस विशेष शुभ संकेत देईल. संयम आणि सुसंवाद जपा.
उपाय: सोमवारी पांढरे फुल अर्पण करा आणि ‘ॐ नम: शिवाय’ अकरा वेळा जपा.
वृश्चिक
या आठवड्यात तुमची व्यक्तिमत्त्वाची ताकद आणि आकर्षण प्रभावी ठरेल. नवे विचार आणि प्रयत्न यशस्वी होतील. गुऊवार अनुकूल राहील. श्र्रद्धा आणि दृढ निश्चय कायम ठेवा.
उपाय: गुरुवारी पिवळे फुल अर्पण करा आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ सात वेळा जपा.
धनु
या आठवड्यात प्रेम, भावना आणि नात्यांमध्ये ऊब वाढेल. कुटुंबातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. बुधवारी आनंददायी बातमी मिळू शकते. विश्वास आणि आपुलकी वाढवा.
उपाय: बुधवारी पिवळे गोड खा आणि ‘ॐ विष्णवे नम:’ सात वेळा जपा.
मकर
या आठवड्यात काही प्रसंग मजबूत बनवतील. धैर्य आणि संयम ठेवल्यास मोठा लाभ मिळू शकतो. शनिवार तुमच्यासाठी शुभ असेल. ठाम रहा आणि प्रयत्न सुरू ठेवा.
उपाय: शनिवारी काळे तीळ अर्पण करा आणि ‘ॐ शं शनैश्चराय नम:’ अकरा वेळा जपा.
कुंभ
या आठवड्यात आर्थिक आणि मानसिक स्थैर्य वाढेल. केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसतील. मंगळवार शुभ राहील. कृतज्ञता ठेवून आत्मविश्वासाने पुढे चला.
उपाय: मंगळवारी पाण्यात तुळशीचे पान अर्पण करा आणि ‘ॐ नमो नारायणाय’ सात वेळा जपा.
मीन
या आठवड्यात प्रेम, समजूतदारपणा आणि सौहार्द वाढेल. नवे संबंध किंवा संधी लाभदायी ठरतील. गुऊवार तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल. मनापासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
उपाय: गुरुवारी गूळ व दूध अर्पण करा आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ अकरा वेळा जपा.
Tarot remedy –
मंगळवारी सकाळी 11:11 वा. किंवा रात्री 11:11 वा. आपल्या मनातील इच्छा कागदावर लिहा. ती 11 वेळा वाचा आणि उशीखाली ठेवा. पुढच्या दिवशी तोच कागद पाकिटात किंवा कपाटात ठेवा. इच्छा पूर्ण होईल.




