दि. 18.08.2024 ते 24.08.2024 पर्यंत
मेष
परिवारातील सदस्यांच्या आजारपणामुळे खर्च वाढेल आणि त्यामुळे चिंता वाटू शकते. अचानक काही न टाळता येणाऱ्या खर्चांमुळे सुद्धा आर्थिक तंगी जाणवू शकते. आपल्या कामावर आणि प्रायोरिटीजवर जास्त फोकस देण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी काही कामे तुमच्या मनाप्रमाणे घडतील. नवीन संधी प्राप्त होण्याची शक्मयता आहे.
कोहळ्याचे दान द्यावे.
वृषभ
नको ते विचार मनात आल्याने त्रास होऊ शकतो. अशावेळी मनावर कंट्रोल ठेवून शांत राहणे योग्य ठरेल. या आठवड्यात अनावश्यक खर्च करण्यापासून दूर राहा, पण एखाद्या मंगल कार्यासाठी केलेला खर्च योग्य ठरेल. उपाहारप्राप्ती होईल. एखाद्या समारंभामध्ये भाग घेऊन चांगल्या लोकांच्या भेटीगाठी होतील. प्रवास घडेल.
लाल वस्तू दान द्यावी.
मिथुन
आर्थिक बाबतीमध्ये समाधानकारक आठवडा असला तरी जर अनेक स्रोत असतील तर त्यातील एकाच स्रोतातून फायदा होईल. घरातील किंवा कुटुंबातील काही बदल तुम्हाला भावनिक करू शकतात. या आठवड्यात तुमच्या प्रतिमेला तडा जाईल, असे कोणतेही वर्तन हातून घडणार नाही याची काळजी घ्यावी. वैवाहिक जोडीदारामुळे त्रास जाणवेल.
मुंग्यांना साखर घालावी.
कर्क
आरोग्याच्या दृष्टीने सध्या अनुकूल कारण असल्याने खाण्यापिण्याच्या सभेकडे चांगले लक्ष देणे गरजेचे असेल. या आठवड्यात धनसंचयाकडे विशेष लक्ष द्यावे. पुढे जाऊन पैशांचा प्रॉब्लेम होऊ नये याची काळजी घ्यावी. वैवाहिक जोडीदाराबरोबर फिरायला जायचा प्लॅन कराल. व्यापारी वर्गाने अति लोभापासून दूर राहण्याची गरज आहे.
पांढऱ्या कपड्यात हळद बांधून तिजोरीत ठेवावी.
सिंह
भावनेच्या भरात कुठलाही घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाला कारणीभूत होऊ शकतो. आर्थिक बाबतीमध्ये तंगी जाणवत असेल तर करत असलेल्या कामाला वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या रितीने करण्याची गरज आहे. जे लोक सिंगल आहेत आणि नव्या रिलेशनशिपसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना चांगली बातमी कळेल. वेळेचा सदुपयोग करा.
लाल रु माल जवळ ठेवा.
कन्या
हा आठवडा अडचणी आणणारा आहे. शत्रूंशी भांडण होऊ शकते, अपमानाची भीती राहील. कामात अडथळे येतील आणि काम पूर्ण होण्यास उशीर होईल. त्यामुळे मनात अशांतता राहील. उत्पन्नात घट होऊ शकते आणि पैशाची हानी देखील होऊ शकते, म्हणून निर्णय घ्या आणि सावधगिरीने आणि संयमाने कार्ये राबवा. तब्येतीला जपण्याची गरज आहे.
दुग्ध स्नान करा.
तूळ
स्वभावामध्ये उदारता येईल. दुसऱ्यांना मदत करण्याच्या नादात स्वत:चे नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. एखादा नातेवाईक आर्थिक सहाय्य मागू शकतो. तब्येतीला जपावे लागेल. सहलीचा प्लॅन करत असाल तर सामानाची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यामध्ये काही घटना अशा घडतील, की ज्याने आश्चर्य वाटेल. दुखापतीपासून पायाला जपा.
मजुरांना ताक द्यावे.
वृश्चिक
मनातील राग आणि दुसऱ्यांच्या प्रती असलेला द्वेष यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. तुमच्या मनाप्रमाणे पैशाची आवक न झाल्याने मन जरा उदास होऊ शकते. नवीन संधींच्या बाबतीत हा आठवडा आशा पूर्ण असेल. रिलेशनशिप मजबूत होतील. या आठवड्यात केलेली गुंतवणूक पुढच्या काळाच्या दृष्टीने चांगले फळ देऊ शकते.
एखाद्या धार्मिक स्थळी गरजवंतांना केळी द्यावी.
धनू
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आणि खर्चातून तुम्हाला आराम मिळेल, परंतु पूर्णपणे नाही. वेळ आणि नशीब आपल्या बाजूने राहण्यासाठी आपल्याला आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. आठवड्याच्या पूर्वार्धात स्थान बदलण्याची शक्मयता असली तरी उत्तरार्धात अज्ञाताची भीती राहील. ज्यामुळे मनात अशांतता येईल.
विधवा किंवा मुलीला मदत करा.
मकर
आठवड्याच्या पूर्वार्धात अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागू शकतो. गोंधळ आणि अनावश्यक विचार तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. म्हणून अनावश्यक विचार करू नका आणि जर तुम्ही कोणतेही काम करत असाल तर ते काम पूर्ण करण्यासाठी शक्मय ते प्रयत्न करा. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते.
तुरटीने दात घासा.
कुंभ
आत्मविश्वास वाढेल, परिणामी त्यांना केलेल्या कामात चांगले यश मिळेल. सामाजिक मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठा मिळेल. सर्व परिमाणांमध्ये चांगले परिणाम प्राप्त होतील, ज्यामुळे मनातील विचारांमध्ये सकारात्मकता येईल. चांगल्या वेळेचा 100 टक्के लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण आठवड्याचा उत्तरार्ध नुकसान दर्शवत आहे.
उगवत्या सूर्याला नमस्कार करा.
मीन
नशिबाची साथ मिळण्यासाठी काही प्रमाणात संघर्ष करावा लागेल. पुण्य हानी टाळण्यासाठी या महिन्यात धार्मिक कार्य करा आणि गरीब व्यक्तीला मदत करा. पूर्वार्धात अपमानाची भीती राहील, शारीरिक वेदना व दुखापतीची भीती तुम्हाला सतावेल. उत्तरार्धात तुम्हाला मित्रांकडून लाभ, सन्मान आणि प्रसिद्धी मिळेल आणि प्रत्येक कामात यश मिळेल.
गरजुला अन्नदान करा.
टॅरो उपाय : कोणत्याही आवश्यक कामासाठी घरातून बाहेर पडताना घराच्या उंबरठ्याबाहेर पूर्वेकडे मूठभर रानटी वेल ठेवा, तुमच्या कामाबद्दल सांगा, त्यावर पाय ठेवून कामाला निघा. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुळशीची पाने खाणे (पण चावू नये) देखील शुभ मानले जाते.