10-12-2023 ते 16-12-2023
मेष
आठवडा चांगला सिद्ध होणार आहे. आर्थिक लाभामुळे बँक बॅलेन्स झपाट्याने वाढू शकतो. तुम्हाला प्रवासात यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी अहंकाराचे भांडण टाळणे तुमच्या हिताचे असणार आहे. या आठवड्यात तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुऊवात आनंद घेऊन येणार आहे. तुम्ही केलेल्या योजना या आठवड्यात यशस्वी होऊ शकतात.
अन्न दान करा
वृषभ
या राशीच्या लोकांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती वाट पाहत आहे. अचानक तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असणार आहे. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. कठोर परिश्र्रम तुमच्यासाठी फायद्याचे ठरतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला हा आठवडा जरा खर्चिक होऊ शकतो. शिवाय कामात अडथळे येऊ शकतात.
वस्त्र दान करावे
मिथुन
जवळच्या व्यक्तींच्या सहकार्यामुळे आठवड्यात बरीचशी कामे पूर्णत्वाला जाऊ शकतात. आठवड्याच्या मध्याला कामासंबंधी एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी किंवा व्यक्तीशी ओळख होईल. कौटुंबिक कारणाकरता खर्च होण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर अकारण वाद संभवतो. प्रेमसंबंध सुधारतील. एकंदर पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार आहे.
तुळशीला पाणी घाला
कर्क
हा आठवडा शुभ आणि आनंदी ठरणार आहे. कुटुंबात परस्पर प्रेम वाढणार आहे. घरातील सजावटीमध्ये तुमचे मन रमेल. कुटुंबासोबत खरेदी कराल. आर्थिक लाभामुळे पैशांची समस्या दूर होणार आहे. तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. भावनिक कारणांमुळेही कामाच्या ठिकाणी अडचणी येण्याची शक्मयता आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
दूध दान करा
सिंह
हा आठवडा कामाच्या ठिकाणी बदल घेऊन आला आहे. काही नवीन प्रकल्पाकडे तुम्ही आकर्षित होणार आहात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने प्रभावित करण्यात यशस्वी होणार आहात. कुटुंबात परस्पर प्रेम वाढणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात मध्यम यश मिळणार आहे. आर्थिक खर्च जास्त होणार असून आठवड्याच्या शेवटी जरा एकटे वाटू शकते.
तांब्याचे कडे घाला
कन्या
हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. प्रवासात अडचणी वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये अधिक खर्च होणार असून मालमत्ता खरेदीमध्ये जास्त वेळ आणि पैसा जाणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटणार आहे. आठवड्याच्या शेवटी उत्सव साजरा करण्याचा मूड असणार आहे.
हिरवी गोटी जवळ ठेवावी
तूळ
आठवड्याची सुरूवात प्रसन्नदायी असणार आहे. प्रकल्पातून तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. या आठवड्यात तुमचा सहलीचा मूड असणार आहे. नयनरम्य आणि सुंदर ठिकाणी जाण्याचा बेत तुम्ही आखणार आहात. या आठवड्यातील प्रवास सुखद अनुभव देणारा ठरणार आहे. हा आठवडा खर्चिक असणार आहे. आरोग्यासाठी खर्च होणार आहे.
सफेद रूमाल जवळ ठेवावा
वृश्चिक
आठवडा शुभ परिणाम देणारा ठरणार आहे. अनेक वर्षांनी एखादी व्यक्ती तुम्हाला भेटल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. हा आठवडा प्रवासात यश घेऊन आला आहे. आर्थिक बाबतीत वेळ हळूहळू सुधारणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मर्यादा येणार आहेत. आठवड्याच्या शेवटी, आपण आपल्या प्रियजनांसोबत आनंददायी वेळ व्यतीत करणार आहात.
पिंपळाला प्रदक्षिणा घाला
धनू
हा आठवडा आर्थिक बाबतीत भाग्यशाली ठरणार आहे. सुऊवातीला कोणत्याही नवीन गुंतवणुकीतून तुम्हाला चिंता सतावणार आहे. मात्र नंतर तुम्हाला गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी वाढणार आहेत. कुटुंबावर लक्ष केंद्रित करून कोणताही निर्णय विचारपूर्व घेतल्याने फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी मतभेद होण्याची दाट शक्मयता आहे.
अशोकाचे पान जवळ ठेवा
मकर
हा आठवडा आनंदी असणार आहे. या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. प्रवासातून सुखद अनुभव येणार असून अनेक ठिकाणी प्रवास करावे लागणार आहे. आळस टाळल्यास हा आठवडा प्रगती घेऊन आला आहे. मात्र या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मुलांमुळे मन थोडे उदास असेल, पण आठवड्याच्या शेवटी सगळे सुरळीत होणार आहे.
हळकुंड दान करा
कुंभ
आठवडा उत्तम असणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणतीही नवीन सुऊवात जीवनात प्रगतीचा मार्ग घेऊन येणार आहे. नवीन प्रकल्पातून फायदा होणार आहे. गुंतवणुकीतून लाभ होणार असून नातेसंबंध सुधारणार आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवणार आहात. हा आठवड्यातील प्रवास पुढे ढकलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटेल.
हळदीची गाठ जवळ ठेवा
मीन
आर्थिक लाभासाठीही शुभ आठवडा सिद्ध होणार आहे. गुंतवणुकीतून तुम्हाला अतिशय लाभ होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचेही शुभ परिणाम म्हणून तुमचे आयुष्य बदलणार आहे. कुटुंबात संयम ठेवून घेतलेले निर्णय तुम्हाला शुभ फळ देणार आहेत आठवड्याच्या शेवटी विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायद्याचे ठरणार.
अंगठ्याच्या खाली 24 लिहा
टॅरो कार्ड उपाय : घरात बरकत यावी, समृद्धी असावी, आकस्मिक संकटे येऊ नयेत म्हणून एका काचेच्या बरणीमध्ये खडे मीठ, हळदीच्या गाठी आणि अक्षता काठोकाठ भरून ती बरणी ईशान्य दिशेला उंच जागी पण सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी ठेवावी





