2 ते दि. 7 नोव्हेंबर 2023
(मोक्षाचे मायाजाल: राहू-केतूचे राशी परिवर्तन : 12 घरे, 12 ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्र यांच्यापासून निर्माण होणाऱ्या जवळजवळ असंख्य कॉम्बिनेशन्समधून नेमका कुठला रिझल्ट मिळणार हे ढोबळमानाने सांगणे म्हणजे गवताच्या गंजीत सुई हुडकण्यासारखे आहे. म्हणूनच ज्योतिषाला आधुनिक विज्ञानाची साथ, समोपदेशनाचे कसब, आणि गणिती कौशल्य लागते. . . पुढे वाचा येणाऱ्या खजाना मध्ये!!!)
मेष
मेषवाल्यांना हे राशी परिवर्तन काहीसे संमिश्र्र स्वरूपाचे असेल. अचानक धनलाभ आणि अचानक धनहानी या दोन्हीही गोष्टी तुम्हाला येणाऱ्या दीड वर्षात अनुभवाला येऊ शकतात. आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने हा काळ चांगला असेल. खास करून अपघातापासून स्वत:ला वाचवावे लागेल. फालतू खर्च करण्यापासून स्वत:ला आवरा.
उपाय : कच्च्या जमिनीवर तेलाचे थेंब सांडावे
वृषभ
वृषभवाल्यांना सगळ्या प्रकारच्या लाभाची अपेक्षा करायला हरकत नाही. मित्र परिवारामध्ये वाढ होईल. पण अचानकपणे काही नाती तुटू शकतात. वडीलबंधूंच्या तब्येतीला जपावे लागेल. अडलेली कामे पूर्ण होतील. संपत्ती आणि प्रॉपर्टीचा लाभ होईल. वैवाहिक जीवनात काहीसा ताणतणाव जाणवेल. सबुरीने काम घ्यावे.
उपाय : नियमितपणे माऊतीला अभिषेक करावा
मिथुन
तुम्ही करत असलेल्या नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीचे अनेक संकेत मिळतील. धाडसाने आणि विवेकाने काम केल्यास फायदा नक्की आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या लोकांकरता यशप्राप्तीचे संकेत आहेत. आईच्या तब्येतीला खास करून जपावे लागेल. नियमित व्यायाम करा आणि आपले हृदय स्वस्थ ठेवा.
उपाय : काचेच्या बरणीत गंधक भरून जमिनीत पुरावे
कर्क
कर्कवाल्यांना हा काळ परिवर्तनाचा काळ आहे असे समजायला हरकत नाही. हे परिवर्तन तुमच्या करिअरच्या बाबतीत आणि तुमच्या स्वभावाच्या बाबतीतही शक्मय आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करण्यासाठी उत्सुक असाल. विवाहोत्सुक लोकांना अनुकूल काळ आहे. पोटाच्या समस्यांपासून वाचावे लागेल.
उपाय :जलचरांना नियमितपणे खाणे घाला
सिंह
स्वत:च्या तब्येतीबरोबरच तुमच्या पार्टनरच्या तब्येतीची काळजीही घ्यावी लागेल. आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी करू नका. कौटुंबिक समाधान आणि आर्थिक परिस्थिती याबाबतीत खास करून जागरूक रहा. वाणीवर ताबा मिळवणे गरजेचे आहे. आकस्मिक धनलाभाची शक्मयताही आहे.
उपाय : नियमितपणे भटक्मया कुत्र्यांना बिस्किट घालावे
कन्या
पैशांच्या बाबतीमध्ये भाग्यवान असाल. धनप्राप्ती नियमितपणे होत राहील. अडलेली कामे पूर्ण करण्याकरता जास्त परिश्र्रम घ्यावे लागतील. कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यात बदल होईल. स्थान परिवर्तन होऊ शकते. घरापासून लांब जाऊन यश मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये समस्या निर्माण होतील. पैशांचा योग्य विनियोग करा.
उपाय : उडीद आणि मीठ नियमित दान द्या
तूळ
पैतृक संपत्तीविषयी काही वाद असतील तर त्या वादांना पूर्णविराम मिळण्याची शक्मयता नाकारता येत नाही. यामध्ये तिसऱ्याची मदत घ्यावी लागू शकते. आर्थिक बाजू चांगली असेल. या काळात शेअर मार्केट किंवा जिथे रिस्क आहे अशा ठिकाणी पैसे गुंतवण्यापासून स्वत:ला वाचवा. कोर्टकचेऱ्या, वादावादी संभवते.
उपाय : काळे पांढरेवस्त्र दान करावे
वृश्चिक
संतती करता जे प्रयत्न करत आहेत त्यांना थोडा धीर धरावा लागेल. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्मयता आहे. कौटुंबिक खर्चामध्ये वाढ होईल. करियरमध्ये सुधारणा होऊ शकते. काही नवीन संधी मिळतील. कुटुंबातील व्यक्तींच्या तब्येतीविषयी काळजी वाटेल. अपयशापासून दूर राहण्याकरता मोहापासून दूर राहणे आवश्यक आहे.
उपाय : मोहरीचे तेल नियमितपणे दान द्यावे
धनु
वाहन, राहत असलेले घर किंवा करिअर यापैकी एखाद्या किंवा अनेक गोष्टींमध्ये अनेक प्रकारचे बदल संभवतात. राहत्या घरापासून दूर जाण्याचे योग बनत आहेत. आर्थिकदृष्टीने हे बदल फायदेशीर ठरतील पण मानसिकदृष्ट्या थोडा कष्टदायक बदल असेल. विदेशाकरता प्रयत्न करत असाल तर यश मिळेल. डोळ्यांची आणि हार्मोन्सची काळजी घेणे गरजेचे आहे.
उपाय : अन्नदान करा
मकर
संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल असा काळ असणार आहे. अचानकपणे धनप्राप्ती बरोबरच मानसन्मानाची प्राप्तीसुद्धा शक्मय आहे. या काळात अहंकाराला स्थान देऊ नका. वाहन आणि स्थावर संपत्तीचे योग होत आहेत. नवीन घराकरता प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. घरातील वृद्ध लोकांच्या तब्येतीची काळजी घ्या. लिव्हर संबंधित तक्रारी येऊ शकतात.
उपाय : तुरटीने दात घासावे
कुंभ
धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. आर्थिक बाबतीत सगळ्या प्रकारचे यश प्राप्त करण्याकरता इतरांशी असलेले संबंध मजबूत करावे लागतील. कोणत्याही भ्रमात राहू नका. उधारी देणे पूर्णपणे टाळा. इतरांच्या गोष्टींमध्ये पडणे किंवा जामीन राहणे कोणताही परिस्थितीत करू नका.
उपाय: नियमितपणे शंकराला अभिषेक करावा
मीन
मुख्य म्हणजे घेतलेले कर्ज फेडण्याच्या संधी मिळतील. आर्थिक बाजू सुधारेल, करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. विदेशातून लाभ होण्याची शक्मयता आहे. व्यापारी वर्गाला अनुकूल असे ग्रहमान असेल. बऱ्याच दिवसापासून न सुटलेली समस्या सुटू शकते. कौटुंबिक समाधानाच्यादृष्टीने चांगला काळ आहे. पण जबाबदारी वाढेल. नाक कान घसा इन्फेक्शनपासून वाचा.
उपाय : आंबट गोड मिठाई दान करा
महाउपाय:
राहू आणि केतू म्हणजे मोहमाया आकर्षण आसक्ती याविरुद्ध मोक्ष अशी दोन टोके आहेत. तुमच्या घरामध्येच बाथरूम आणि टॉयलेटची अवस्था राहूचे कार्यशत्व दाखवते. त्यामुळे जितके बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ असेल तितके चांगले फळ राहू देईल. भटक्या कुत्र्यांना त्रासांपासून वाचवणे आणि खायला घालणे हा केतूचा उपाय आहे. अभिमंत्रित मच्छमणी धारण करणे सर्वोत्तम.





