मेष
आर्थिक दृष्टीने या आठवड्यातील सगळ्यात भाग्यवान रास तुमची आहे. पूर्वी ज्या ठिकाणी पैसे अडकले होते तेथून पैसे परत मिळण्याची आशा निर्माण होईल. तब्येत थोडी नरम गरम असेल. चुकीच्या औषधोपचाराने किंवा आपल्या मनाने औषधे घेतली तर तब्येत बिघडण्याची शक्मयता आहे. मित्रांसोबत बाहेरगावी जाण्याचा बेत कराल.
पिंपळाला पाणी घालावे
वृषभ
जवळच्या व्यक्तीने आपुलकीने दिलेला सल्ला स्वीकारला तर त्यातच तुमचे भले आहे. सल्ला देणाऱ्या व्यक्तीच्या इंटेन्शनवर प्रŽचिन्ह घालू नका. कामाच्या ठिकाणी काही लोकांची मनधरणी करावी लागेल. काही वेळेला नमते घ्यावे लागण्याची शक्मयता आहे. व्यावसायिकांना मनाविऊद्ध निर्णय घ्यावे लागतील. तब्येतीला हर प्रकारे सांभाळावे.
पाच प्रकारची सुगंधी फुले जवळ ठेवावी
मिथुन
हेतूपूर्वक कोणाचीही चेष्टा करायच्या भानगडीत पडू नका. एखाद्या नात्यांमध्ये कायमचा दुरावा येऊ शकतो. या आठवड्यामध्ये आपल्या कुटुंबीयांकरता आणि जवळच्या माणसांकरता वेळ काढावा लागेल. त्यांच्याकरता खर्चही करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल एखादी व्यक्ती वरिष्ठानकडे तक्रार करू शकते. सावध रहा.
तांब्याचे नाणे जवळ ठेवावे
कर्क
हा काळ थोडा भावनिक संघर्षाचा असू शकतो. काही कारणाने मनात निराशा येऊ शकते. बरीच कामे एकाच वेळी करावी लागल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन काही चुका होऊ नये याची काळजी घ्या. तब्येतीची फारशी काळजी करण्याचे कारण नसले तरी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. पैशाची आवक समाधानकारक असेल. वडाची मुळी जवळ ठेवावी
सिंह
तुमच्याविषयी लोकांच्या मनामध्ये गैरसमज पसरू नयेत याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खर्चाचे प्रमाण नियंत्रणात ठेवा. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एक विशिष्ट जबाबदारी घ्यावी लागेल. त्याकरता अधिक वेळ द्यावा लागू शकतो. आरोग्याच्या समस्या दूर राहाव्यात म्हणून शक्मयतो प्रवास टाळावा. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
गाईला चारा घाला
कन्या
या आठवड्यामध्ये दुसऱ्यांच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. विशेषत: घरच्याच लोकांच्या आडमुठ्या धोरणांचा राग येऊन थोडीफार भांडणाची परिस्थिती येऊ शकते. वातावरणातील बदलाचा तब्येतीवर परिणाम होऊ नये याची काळजी घ्या. दुसऱ्याला आर्थिक मदत करत असताना स्वत:च्या परिस्थितीकडे सुद्धा लक्ष द्यावे.
हिरवी वस्तू दान द्यावी
तूळ
झेपेल इतकेच काम अंगावर घेतले तर तब्येतीचा त्रास होणार नाही. हा आठवडा आर्थिक बाबतीत थोडा चढउतार दाखवणार असेल. व्यापारी वर्गाला नवीन संधी प्राप्त होतील. विद्यार्थी वर्गाने जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. या आठवड्यात एखाद्या घटनेने चित्त विचलित होऊ शकते. कामाच्या ठिकाणी कोणावरही अति विश्वास ठेवू नका.
पिवळा हात रुमाल जवळ ठेवावा
वृश्चिक
मागच्या काही आठवड्यामध्ये तब्येतीच्या बाबतीत काही तक्रारी आल्या असतील तर त्या कमी होतील. कौटुंबिक वातावरणात सुधारणा होईल. लहान भावांना करता इतरांकडून मदत मागावी लागेल. उत्साहवर्धक बातमी मिळाल्याने मन आनंदी असेल. हाताखालील माणसांकडून काही चुका घडल्यास राग येऊ देऊ नका.
पाच फळांचे दान द्यावे
धनु
लोकांच्या तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत असताना स्वत:च्या तब्येतीकडे आणि कुटुंबाकडे लक्ष देणे गरजेचे असेल. या आठवड्यात अनेक कामे एकावेळी करावी लागल्याने दमछाक होण्याची शक्मयता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये अनपेक्षित अडचणी आल्याने वेगळ्या पद्धतीने विचार करून सोल्युशन काढाल.
वृद्ध माणसाला अन्न दान द्यावे
मकर
बऱ्याच काळानंतर निवांत वेळ मिळाल्याने मन आनंदी असेल. कुटुंबाकरता वेळ काढाल. कुटुंबीयांसोबत इतर गावाला भेट देण्याचा प्लॅन कराल. सहलीला जाणार असाल तर पाण्याच्या ठिकाणी जाण्याचे शक्मयतो टाळावे. आर्थिक बाजू चांगली असेल. मनातील इच्छा पूर्ण होतील. जवळच्या मित्राकडून कामाच्या बाबतीत मदत मिळेल.
कष्टकऱ्यांना ताक दान द्या
कुंभ
पोटाच्या तक्रारी, अंगदुखी यासारखे छोटे मोठे आजार त्रास देऊ शकतात. योग्य वेळी वैद्यकीय मदत घ्या. तुमच्या जवळच्या मित्रांपैकी एखाद्या मित्राला मदत करण्याकरता पैसे खर्च करावे लागू शकतात. पण ही मदत व्यर्थ जाणार नाही. नातेवाईकांच्या गोतावळ्यात एखाद्या व्यक्तीबद्दल गुप्त माहिती कळेल. समाजामध्ये नावलौकिक वाढेल.
दीपदान करावे
मीन
कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये थोडीशी गोंधळाची परिस्थिती असू शकते. काही उलट सुलट बातम्या कानावर पडल्याने संभ्रमित अवस्था असेल. अशावेळी लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास न ठेवता आपले काम नेटाने करावे. तब्येतीच्या बाबतीत विशेष काळजी करण्याचे कारण नाही. वैवाहिक जोडीदाराची मदत मिळेल. गरजूला आर्थिक मदत करा
कर्जापासून मुक्ती मिळवण्याकरता, भाग्योदय होण्याकरता आणि बंधनातून मुक्त होण्याकरता हा तोडगा करू शकता. काही लोक पिंजऱ्यातून पोपट विकण्या करता येतात. अशावेळी त्यांच्याकडून पिंजरा सकट पोपट विकत घेऊन त्याला मुक्त करावे. कधीही पिंजऱ्यातील पक्षी पाळू नये.









