तेरे मेरे सपने (स्वप्न शास्त्र: भाग 3)
मागच्या वेळेला ज्या चार अवस्था मी सांगितल्या (जागृती, निद्रा किंवा सुशुप्ती, स्वप्न आणि तुरीय) त्यापैकी जागृती आणि स्वप्नाबद्दल अगदी थोडक्मयात माहिती दिली. आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ काय असतो, त्यावर काही उपाय करायचा असतो का अशा प्रश्नांकडे वळण्यापूर्वी निद्रा आणि तुरीय या अवस्थांबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. आपण ज्याला निद्रावस्था म्हणतो किंवा स्लिप प्रोसेस म्हणतो त्यामध्ये चार पायऱ्या असतात. N1, N2, N3 आणि REN. N1 म्हणजे आपण जेव्हा झोपायला जातो, आडवे होतो तेव्हा एक संदेश आपल्या मेंदूकडे जातो तो म्हणजे आता झोपेची वेळ झालेली आहे. आडवे पडल्यानंतर N1 अवस्थेमध्ये हृदयाचे ठोके थोडे मंदावतात. शरीरातील स्नायू शिथिल व्हायला सुऊवात होते. श्वासदेखील मंदावतो. ही अवस्था साधारण एक ते दीड मिनिटापर्यंत चालते. त्यानंतरची पायरी किंवा अवस्था म्हणजे N2. या अवस्थेमध्ये श्वास आणि ह्रदयाची गती आणखी मंदावते. स्नायू जास्त शिथिल होतात. डोळ्यांची हालचाल होत नाही. मेंदूमधून झोपेला आवश्यक असलेली रसायने स्त्रवतात. शरीराचे तापमान थोडे कमी होते. N3 या अवस्थेमध्ये हृदयाची गती आणि श्वास आपल्या किमान लयीमध्ये चालतात. शरीरातील स्नायू संपूर्णपणे शिथिल होतात. डोळ्यांची हालचाल होत नाही. मेंदूतील डेल्टा लहरी याच वेळेला सुरू होतात. शरीराची झीज भरून काढायची सुऊवात होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती याच अवस्थेमध्ये मजबूत होते. थोडक्मयात ही गाढ झोपेची अवस्था असेल. सगळ्यात शेवटची अवस्था म्हणजे REM त्याला रँडम आय मोमेंट असेही म्हणतात. ही स्वप्नांची सुऊवातीची अवस्था असते. यामध्ये डोळ्याची बुब्बुळे हलायला सुऊवात होते. हृदयाची गती आणि श्वासांची गती वाढते. आणि स्वप्नांची सुऊवात होते. मागे सांगितल्याप्रमाणे मनाचा कारक ग्रह चंद्र आहे आणि कुंडलीतील चतुर्थ स्थान हे सुख स्थान म्हणून ओळखले जाते. निद्रा हे एक प्रकारचे सुखच आहे. म्हणून चतुर्थ स्थानावरून निद्रा पाहिली जाते. चंद्राला जर बळ नसेल किंवा चतुर्थ स्थान बिघडले असेल तर निद्रानाश किंवा झोपमोड होणे यासारखे प्रकार होतात. जाता जाता अशा प्रकारच्या समस्येवर एक तोडगा सांगतो. जर झोप न येण्याचा किंवा वारंवार झोपमोड होण्याचा त्रास असेल तर ‘ॐ शांते प्रशांते महा योगिनी महा निद्रे स्वाहा’ हा मंत्र झोपताना 333 वेळा म्हणावा. मोजताना बोटांवर किंवा माळेवर मोजू नये. मनातल्या मनात मोजावे. पुढच्या भागात वेगवेगळी स्वप्ने आणि त्यांचे अर्थ यावर विचार केला जाईल (क्रमश:)
महा उपाय: (आजपासून राशीनुसार उपासना आणि कवच देत आहे)
मेष-कृष्ण एकादशीला गणपतीच्या मंदिरात सव्वा किलो गूळ अर्पण करावा. प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा. दर महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला वडाच्या झाडाला पाणी घालावे, खडेमीठ वाहावे आणि प्रदक्षिणा घालावी. शक्मयतो रविवारी उपवास करावा.
सोपी वास्तू टीप: काही लोकांच्या घरात देवांच्या भरमसाठ मूर्ती, फोटो असतात. आपली कुलदेवी किंवा कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती देवघरात असणे अत्यंत आवश्यक आहे. बाकी सगळ्या देवांना देव्हाऱ्यात ठेवून कुलदेवतेला स्थान दिले नाही तर काहीच उपयोग होत नाही.
प्रा. पं. तेजराज किंकर
मेष
शुक्रवार शनिवार प्रवासाचे योग आहेत. तब्येतीची विशेष तक्रार असणार नाही. कुटुंबात छोट्या छोट्या कारणाने तणाव निर्माण होऊ शकतो. कलाकारांना चांगल्या संधी प्राप्त होतील. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला मेहनतीचे फळ मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
उपाय : माऊतीच्या छातीवरचा शेंदूर कपाळी लावावा.
वृषभ
डोकेदुखी, बेचैनी यासारख्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेण्याचा सल्ला देत आहे. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्मयता आहे. तीर्थयात्रेचा योग होत आहे.
उपाय : उडदाचे दान द्यावे.
मिथुन
तब्येतीला जपावे लागेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहावे याकरिता विशेष प्रयत्न करावे लागतील. धनप्राप्ती सध्या जेमतेमच असली तरी पुढे चांगले योग होत आहेत. कामानिमित्त प्रवासात चांगल्या ओळखी होतील. लेखनकार्यामध्ये यश प्राप्त होइल. प्रॉपर्टीसंबंधी विवाद असतील तर त्यामध्ये समझोत्याचा योग आहे.
उपाय : भटक्मया कुत्र्यांना अन्न द्यावे.
कर्क
व्यापाऱ्यांना सर्वसामान्य असा काळ आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक वातावरणात समाधान प्राप्त होईल. जुने नातेवाईक भेटतील. आठवड्याच्या शेवटी प्रवासाचे योग आहेत. प्रॉपर्टीचे प्रŽ मार्गी लागतील. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला कामी येईल. नोकरदार वर्गाला सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात ताण-तणाव असेल.
उपाय: सफेद गाईला चारा घाला.
सिंह
पाण्याच्या ठिकाणी प्रवास करण्याचा योग आहे. धनप्राप्ती उत्तम असेल. जे लोक शेअर बाजारात काम करतात किंवा गुंतवणूक करतात त्यांना सावध राहण्याची गरज आहे. प्रेमप्रकरणात गैरसमजामुळे दुरावा येऊ शकतो. नोकरदार वर्गाला उत्तम संधी प्राप्त होतील. गुप्त शत्रूंपासून सावध रहा.
उपाय : कुमकुम घातलेल्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे.
कन्या
आयुष्याकडे नवीन दृष्टीने बघण्याची संधी प्राप्त होऊ शकते. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होऊ शकते. प्रवास करताना सावध राहण्याची गरज आहे. वस्तू हरवणे किंवा दुखापत होणे यासारखे योग आहेत. जे लोक प्रॉपर्टीसंबंधी व्यवसायात आहेत त्यांना अपेक्षित फायदा होईल. काही नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात.
उपाय: लहान मुलींना शालेय वस्तू घ्याव्यात.
तुला
धनप्राप्ती कष्टसाध्य आहे. प्रवास घडेल आणि त्यातून फायदा होण्याची शक्मयता आहे. नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत असाल तर अनुकूल काळ आहे. प्रेमसंबंधात मधुरता येईल. छोट्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीत काम करणाऱ्यांना वरिष्ठांचा त्रास संभवतो.
उपाय : लहान मुलांना आंबट गोड पदार्थ द्यावे.
वृश्चिक
पैशांचे आगमन चांगले असेल पण ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तर त्यातून आणखी फायदा होईल. आपल्या वैवाहिक जोडीदाराला आनंद व्हावा म्हणून विशेष प्रयत्न कराल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी चार चौघांचा सल्ला घ्यावा.
उपाय : तळहातावर लाल स्वस्तिक काढावे.
धनु
तब्येतीची काळजी घ्यावी. आर्थिकदृष्टीने अनुकूल काळ आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. आपल्या मधुर वाणीमुळे लोकांची मने जिंकाल. प्रवासाचे उत्तम योग आहेत. प्रॉपर्टीसंबंधी वाटाघाटी सध्या टाळाव्यात. नोकरदार वर्गाला राजकारणामुळे त्रास होईल. तीर्थयात्रा कराल.
उपाय : हळदीचा टिळा लावावा.
मकर
व्यापाराच्यादृष्टीने हा आठवडा सर्वसामान्य असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले तर यश मिळण्याची शक्मयता आहे. प्रवास सध्या टाळावा. नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास संभवतो. वैवाहिक जीवनात ताणतणाव अनुभवाला येईल. अचानक धनप्राप्तीचे योग आहेत. अपघातापासून सावध रहा. मानसन्मान प्राप्त होईल.
उपाय : काजळाची डबी जवळ ठेवावी.
कुंभ
प्रवासात सोबत असणाऱ्या लोकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. आरोग्याचा पाया चांगला असेल. धनप्राप्ती करता विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबात जेष्ठ व्यक्ती विषयी मतभेद संभवतो. येणाऱ्या काळात नोकरदार वर्गाने विशेषत सावध राहण्याची गरज आहे. तुमच्याविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न होईल.
उपाय : शंकराला जलाभिषेक करावा.
मीन
कामाच्या ठिकाणी थोड्या अडचणींचा सामना कराल. कुटुंबीयांची साथ मिळेल. प्रवास टाळावा. प्रॉपर्टीची कामे सध्या टाळावीत. शेअर बाजारापासून दूर रहावे. नोकरदार वर्गाला शाबासकी मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. लहानमोठ्या अपघातापासून सावध राहावे.
उपाय : दत्त दर्शन घ्यावे.





