संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या गोकुळची सर्वसाधारण सभा आज चालु असून या सभेमध्ये सत्ताधारी सतेज पाटील आणि महाडिक गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कडक बंदोबस्तात चालु असलेल्या या सभेमध्ये महाडिक गटाचे समर्थक घुसल्याने एकच गोंधळ झाला. आपल्या समर्थकांसह सभागृहाच्या बाहेर थांबलेल्या शौमिका महाडिक माध्यमांशी संवाद साधताना आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यावर गंभिर आरोप केला. त्या म्हणाल्या सत्ताधाऱ्यांनी बोगस ठरावधारकांना प्रवेश दिला असून त्यांना ठरावाची झेरॉक्स वाटली आहेत. तसेच खऱ्या सभासदांना ताटकळत बाहेर ठेवले असल्याचा आरोपही त्यांनी सतेज पाटलांवर केला.
शौमिका महाडिकांच्या या आऱोपांना प्रत्त्युत्तर देताना आमदार सतेज पाटील म्हणाले, “खरे सभासद आधीचे सभागृहात येऊन बसलेले आहेत. सभागृहाच्या दारात जे गोंधळ घालत आहेत ते महाडिकांचे गुंड आहेत. ते या सभेच्या ठिकाणी दंगा घालत आहेत. हे कोल्हापूरच्या दृष्टीने, सहकाराच्या दृष्टीने अशोभनीय आहे. विरोधकांचे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांची योग्य ती उत्तरं संचालक मंडळ देणार आहे. सभा कितीही वेळ चालली, तरी चालवण्याची आमची तयारी आहे. संध्याकाळी पाच वाजले तरी ही सभा संपन्न होणार.” असे स्पष्टीकरण सत्तादारी गटाचे सतेज पाटील यांनी माध्यमांसमोर दिले आहे.









