आग विझविण्यासाठी तीन तास कसरत : येळ्ळूर-सुळगे ग्रामस्थांकडून सन्मान
बेळगाव : सुळगे (येळ्ळूर) येथील माळरानामधील गवताला अज्ञातांनी आग लावली. घटनेनंतर ती आग सर्वत्र पसरत गेली. जवळपास दहा ट्रॅक्टर गवत या आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. त्याला लागून आणखी गवत तसेच झाडे होती. त्यामुळे सुळगे येळ्ळूर येथील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ती आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल तीन तास कसरत घेतली. भर उन्हामध्ये घामाच्या धारा गळत होत्या. तरीही आग विझविण्यासाठी हे सर्व कार्यकर्ते धडपडत होते. त्या कार्यकर्त्यांचा गावच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे.
आंबा, काजू झाडेही जळाली
अध्यक्षस्थानी जय भवानी युवक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर नावगेकर होते. पी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. या आगीमध्ये गवताच्या गंज्या तसेच आंबा, काजू आणि इतर झाडे जळून हजारोंचे नुकसान झाले. काही घरांना आणि इतर गंज्यांनाही आग लागणार होती. मात्र, त्याची दखल घेऊन या सर्व कार्यकर्त्यांनी ती आग आटोक्यात आणली.
पीडीओंकडून दखल
य् ााची दखल जय भवानी युवक मंडळ, भावकेश्वरी कृषी पत्तीन संस्था, ग्राम पंचायत पीडीओ यांनी घेतली. पीडीओ दुर्गाप्पा तहसीलदार, अमित कुकडोळकर, रामचंद्र नंद्याळकर या सर्वांनी त्यांचा सन्मान केला. जय भवानी युवक मंडळाचे उपाध्यक्ष यल्लाप्पा कणबरकर, परशराम होनगेकर, सूरज पाटील, हणमंत पाटील, प्रसाद पाटील, साहिल कुकडोळकर, गोटू कुकडोळकर, भूषण पाटील, यल्लाप्पा वि. पाटील, राहुल पाटील, मोहन कुकडोळकर, अनिकेत येळ्ळूरकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक बी. बी. पाटील यांनी केले.









