बार असोसिएशनतर्फे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
येथील विविध न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या बदल्या झाल्यानंतर त्या ठिकाणी नूतन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. बहुसंख्य न्यायाधीशांनी पदभार स्वीकारल्यानंतर बुधवारी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने सर्व न्यायाधीशांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी होते.
मुख्य न्यायालयाच्या न्यायाधीशपदी मुरलीधर पै, दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी पवनेश डी., तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी हरिष ए., चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी मोहन प्रभू, पाचवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी अश्विनी श्रीयण्णावर, सहावे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी चेन्नाप्पा गौडा, आठवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशपदी के. कात्यायणी, जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिवपदी पी. मुरलीमोहन रेड्डी याचबरोबर दिवाणी न्यायालयामध्ये नियुक्त झालेल्या सर्व न्यायाधीशांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशा मिनाक्षी बन्नी या निवृत्त झाल्या. त्याबद्दलही त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी सर्वांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी बार असोसिएशनचे जनरल सेपेटरी ऍड. गिरीराज पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष ऍड. सचिन शिवण्णावर, उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, जॉईंट सेपेटरी ऍड. बंटी कपाई आदी उपस्थित होते.
बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी यांनी सर्व न्यायाधीशांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला सदस्य ऍड. महांतेश टी. पाटील, ऍड. अभिषेक उदोसी, ऍड. इरफान बयाळ, ऍड. पी. के. पवार, महिला प्रतिनिधी ऍड. पूजा पाटील, ऍड. आदर्श ए. पाटील यांच्यासह वकील उपस्थित होते.









