सांखळी : देशातील प्रमुख राज्यात बँकिंग क्षेत्रात मनाचे स्थान प्राप्त करणाऱ्या आणि संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या लोकमान्य मल्टिपर्पज कॉ-ऑप. सोसायटी लि. तर्फे सांखळी रवींद्र भवनमध्ये ‘चर्चा तर होणारच!’ या नाटकातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या नाटकाचा प्रयोग रविवारी झाला. लोकमान्य मल्टिपर्पज कॉ-ऑप. सोसायटी लि. (मल्टि-स्टेट) प्रधान कार्यालय पुणे महाराष्ट्र प्रस्तुत आणि कल्पना विलास कोठारी यांचे सादरीकारण आणि रंगनिल क्रीएशन्स निर्मित एक लोकमार्गदर्शन, पुस्तकी लेखक व छपाई करणाऱ्या कामगिरीवर वर्तमान काळातील दोन्ही बाजू मांडणारी सर्व उत्कृष्ट कलाकृती दर्शवणारे मराठी नाटक ‘चर्चा तर होणारच!’ या नाटकाचा प्रयोग रविवारी सांखळी रवींद्र भवन सभागृहात सादर करण्यात आला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकात क्षितीज झारापकर, आस्ताद काळे, आणि आदिती सारंगधर यांनी भूमिका साकारल्या होत्या. यावेळी लोकमान्य सोसायटीचे उत्तर गोवा क्षेत्रीय व्यवस्थापक कुमार प्रीयोळकर, विभागीय व्यवस्थापक आग्नेलो कर्व्हालो, प्रणाली काणेकर आणि गोविंद काळे, सावंत यांच्या हस्ते नाटकातील कलाकारांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांना प्रवेशिका अर्ध्या किंमतीत
‘चर्चा तर होणारच!’ नाटकात युवा वर्गाला सामाजिक बोध देणारी कलाकृती असल्याने व तीन कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहण्यासाठी विद्यार्थीवर्गाने हे नाटक पाहिले पाहिजे तसेच पुण्यात होणाऱ्या या नाटकाच्या प्रवेशिका विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या किंमतीत उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









