दीपक केसरकर मित्र मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम
सावंतवाडी : प्रतिनिधी
ना. दीपक भाई केसरकर मित्र मंडळ सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक शाळेतील गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांचा व शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उद्या बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे सकाळी 11 .00 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. या समारंभात कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी प्रांताधिकारी श्री. प्रशांत पानवेकर, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. प्रदीप कुमार कुडाळकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक )श्री. सुभाष चौगुले ,दीपक भाई केसरकर मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र ,भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे .या कार्यक्रमात एन सी सी मध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या काळसुलकर शाळेची विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी खानोलकर तसेच किक बॉक्सिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ खेळणारा सावंतवाडी तालुक्याचा सुपुत्र साईल पास्ते याचाही गौरव करण्यात येणार आहे .तालुक्यातील ज्या शाळांनी इयत्ता दहावी/ बारावीचे निकाल शंभर टक्के लावले आहेत त्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव केला जाणार आहे .तरी या कार्यक्रमाला संबंधित सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन दीपक भाई केसरकर मित्र मंडळ व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. असे आवाहन दीपक भाई केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे यांनी केले आहे









