स्वामी ब्रह्मेशानंदाचार्य यांचे पंतप्रधान मोदींचे कौतुक
पणजी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद भवनमध्ये ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक संमत कऊन देशातील समस्त मातृशक्तिचा गौरव वृद्धिंगत केला आहे. मातृशक्तिचा हरएक क्षण, गुण, त्यांचे औदार्य, ममत्व, दुसऱ्यांसाठी समर्पित आहे. आज या नारीशक्तींनी पुढे येऊन आपल्या संसदेतील राज्यसभा, लोकसभा, विधानसभा असो जिथे कुठे आपल्याला देशसेवा करण्याची संधी मिळते, त्याठिकाणी आपण जऊर सहभागी होऊन देशाचा सन्मान वाढवावा, असे प्रतिपादन पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीती ‘नारीशक्ति वंदन अधिनियम’ विधेयक निर्णयासंदर्भात काढले. अनंत चतुर्दशी विशेष दत्तगुऊवार श्री दत्त पद्मनाभ पीठ पीठाधीश्वर पद्मश्री सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या उपस्थित झाला. याप्रसंगी पूज्य स्वामींनी संबोधित केले.
पूढे पूज्य स्वामीजी म्हणाले, आजपर्यंत महिलांनी आपला धर्म, आपली संस्कृती नारीशक्तीने शाबूत ठेवलेला आहे. आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीला, आपल्या धर्माला श्रेष्ठ बनवायचे असेल तर नारीशक्तिचा मान, तिच्या गुणवत्तेला स्थान देण्याची आवश्यकता आहे. जी नारी आपले संपूर्ण जीवन आपल्या परिवारासाठी, आपल्या देशासाठी समर्पित करते, अशा नारीला आपण या नारीशक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून आपलं दायित्व पार पाडले आहे. श्री दत्त पद्मनाभ पीठाच्या नारीशक्तीने एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘नारीशक्ति वंदन अधिनियम’ विधेयक संमत करून घेतल्याबद्दल आभार मानले व या निर्णयासंदर्भत गौरवोद्गार काढले. महिला सशक्तीकरण संदर्भातील हा निर्णय आम्हा सर्व महिलांसाठी आधारभूत आहे, ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’,









