दाणोलीतील समर्थ साटम महाराज वाचनालयाचा उपक्रम
ओटवणे प्रतिनिधी
दाणोली येथील समर्थ साटम महाराज वाचनालयाच्यावतीनेशिक्षक दिनाचे औचित्य साधुन ग्रामीण भागात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून सेवानिवृत्त झालेल्या दहा शिक्षकांसह व दोन आजी शिक्षक व शिक्षीकेचा सन्मानपत्र, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे, माजी उपाध्यक्ष श्रीकृष्ण सावंत, उपाध्यक्ष भास्कर परब, शिक्षिका उर्मिला कुलकर्णी, सदस्य डॉ विठ्ठल सावंत, ग्रंथपाल दीपा सुकी उपस्थित होते. यावेळी भरत गावडे यांनी उपस्थित सत्कारमूर्ती शिक्षकांचा परिचय करून शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले.
यावेळी अगदी दुर्गम भागात ज्ञानदानाचे कार्य करून संस्कारक्षम पिढी घडवणारे शिक्षक श्रीकृष्ण सावंत, सुवर्णा गवस, जनार्दन भागवत, उर्मिला कुलकर्णी, सोमनाथ ठाकूर, विदुल पाटकर, संतोष वैज, दीपा चोडणकर, समिक्षा राऊळ, रिया सांगेलकर, संयोगिता राऊळ (अंगणवाडी ताई), विजय देसाई यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सन्मानित सर्व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त करताना अध्यापनातील आनंदाचे क्षण सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत गावडे यांनी तर आभार दीपा सुकी यांनी मानले.









