सावंतवाडी कॅथलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्यावतीने गौरव
ओटवणे प्रतिनिधी
रक्तदान चळवळीतील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा सावंतवाडी कॅथलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्यावतीने सन्मान करण्यात आला. कॅथलिक पतसंस्थेच्या रविवारी झालेल्या २९ व्या वार्षिक सभेत मान्यवरांच्या देव्या सुर्याजी यांना सन्मानित करण्यात आले.
सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी आरोग्य व सामाजिक क्षेत्रात विशेषतः रक्तदानदान चळवळीत केलेल्या केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गेली अनेक वर्षे युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देव्या सूर्याजी आणि त्यांचे सर्व सहकारी काम करीत आहेत आहेत. त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांना रक्तदान करुन त्यांना जीवदान दिले आहे. तसेच रक्तदात्यांची फौज निर्माण केली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी युवा रक्तदाता संघटनाही ब्लड बँकच ठरली आहे. तसेच कोरोना काळातही स्वतःचा जीव धोक्यात घालून युवा रक्तदाता संघटनेने केलेले कार्य उल्लेखनीय होते. या कार्याची दखल घेऊनच देव्या सूर्याजी यांना सन्मानित करण्यात आले.









