स्व.ॲड.दीपक नेवगी स्मृती पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित
सावंतवाडी
कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी, बॅरिस्टर नाथ पै सभागृहात जेष्ठ साहित्यिक विद्याधर भागवत व्यासपीठावर सावंतवाडी येथे संपन्न झालं. यावेळी संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कोमसापचे मार्गदर्शक सदस्य स्व. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री अच्युत सावंत भोसले यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर, कोमसापच्या अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, दैनिक तरुण भारत संपादक शेखर सामंत आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अच्युत सावंत भोसले यांनी भरीव असे कार्य केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन निवड समितीने स्व. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृती पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.









