प्रतिनिधी/ बेळगाव
दहावी परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या बैलहोंगल तालुक्यातील रुपा पाटील या विद्यार्थिनीचा जिल्हा पंचायत सभागृहात शनिवारी गौरव करण्यात आला. देवलापूर (ता. बैलहोंगल) येथील सरकारी हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत 625 पैकी 625 गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. तिचा बैलहोंगल विधानसभा मतदार संघाचे आमदार महांतेश कौजलगी व जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण खात्याच्या उपनिर्देशक लिलावती हिरेमठ, उपकार्यदर्शी बसवराज अडवीमठ, बीईओ ए. एन. पॅटी, शाळेचे एसडीएमसी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.









