सावंतवाडी । प्रतिनिधी
आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान देऊन नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेचा केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला . सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना 24 तास सेवा दिली जाते. याचीच दखल केंद्र शासनाने घेतली असून संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअरचे आभार मानून संस्थेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.









