वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चेतेश्वर पुजारा हा त्याच्या 100 व्या कसोटीत शतक झळकावणारा पहिला भारतीय होईल, अशी आशा माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी शुक्रवारी व्यक्त केली. हा अनुभवी फलंदाज कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास याबाबतीत इतरांसाठी आदर्श आहे, असेही गावसकर पुढे म्हणाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ााषक मालिकाया दुसऱया कसोटी सामन्यात 100 कसोटींचा टप्पा गाठणारा पुजारा हा 13 वा भारतीय ठरला आहे.
कसोटीत भारतीय फलंदाजीचा मुख्य आधार राहिलेल्या पुजारो त्याचे कुटुंबीय आणि संघ सहकाऱयांनी अभिनंदन केल्यानंतर त्याच्या कामगिरीचा गौरव करताना गावसकर यांनी त्याला विशेष पॅप बहाल केली. ‘100 कसोटी खेळलेल्या खेळाडांया क्लबमध्ये स्वागत आहे. मी शुभेच्छा देतो आणि प्रार्थना करतो की, 100 व्या कसोटीत मोठे शतक झळकावणारे तुम्ही पहिले भारतीय बनावे आणि दिल्लीत आणखी एका विजयाचा पाया घालावा’, असे गावसकर म्हणाले. गावसकर स्वतः 125 कसोटी सामने खेळले आहेत. जेव्हा पुजारा फलंदाजीसाठी बाहेर पडतो तेव्हा असे वाटते की, तो जणू भारताचा ध्वज सोबत घेऊन जात आहे. त्याने सदैव भारतासाठी स्वतःला झोकून दिले आहे, असेही ते म्हणाले.









