प्रतिनिधी /तिसवाडी
श्री वनदेवी मुकोबा देवीचा वर्धापन निमित्त, श्री रवळनाथ क्रिएशन करमळी स्वस्ते तर्फे सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कुंभारजुवा मतदारसंघाचे आमदार श्री राजेश फळदेसाई . कोरोनाच्या काळात एका वेगळ्या पद्धतीने सामाजिक कार्य श्री रवळनाथ क्रिएशन करमाळी संस्थेचे कलाकाराने केले होते म्हणून त्यांचा सत्कार, कलाकार महेंद्र पर्वतकर, गुऊनंद आमोनकर , विनोद शिरोडकर ,निकिता दळवी ,दीपेश दळवी , दीपाश्री दळवी व दोन कोविड वॉरियर सदानंद भोमकर , महेंद्र पर्वतकर व ज्येष्ठ कलाकार लिंमो जांभावलीकर , प्रदीप नाईक यांचा सत्कार आमदार श्री राजेश फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आला. श्री रवळनाथ क्रिएशन करमाळी स्वस्ते तर्फे आमदार राजेश फळ देसाई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुऊवात दीप प्रज्वला करून झाली . कार्यक्रमाचे स्वागतस्वागत श्री दीपेश दळवी यांनी केले व नंतर आमदार राजेश फळ देसाई यांनी दिलेल्या भाषणात म्हटले कि कलाकारांना कोणतेही मदत असेल तर ते सदा त्यांच्या पाठीशी उभे राहील …. श्री रवळनाथ क्रिएशन करमाळी स्वस्ते च्या कलाकारांचे कौतुक केले . कार्यक्रमाची सूत्रसंचालन व आभार व्यक्त श्री प्रदीप नाईक यांनी केले.









