मालवण / प्रतिनिधी
महसूल सप्ताह अंतर्गत मंडळ अधिकारी मिनल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 05/08/2023 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या विषयासंदर्भात ग्रामपंचायत कांदळगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला त्यांच्या समस्या व अडीअडचणी बाबत विचारणा करण्यात आली स्वतः तलाठी कांदळगाव माजी सैनिक असल्याने त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला .
यावेळी शासनाच्या विविध अर्थसाह्य योजना सलोखा योजना याबाबत माहिती देण्यात आली. मयत खातेदार यांचे वारस तपास करून घेण्याबाबत तलाठी कांदळगाव यांनी माहिती दिली. सदर कार्यक्रमास माजी सैनिक मंडळ अधिकारी कोळंब तलाठी, कांदळगाव सरपंच, ग्रामपंचायत कांदळगाव उपसरपंच, सदस्य पोलीस पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.









