उच्च व तंत्र शिक्षण विभाग, माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचा करिअर कट्टा’ उपक्रम
कोल्हापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाअंतर्गत राज्यभरामध्ये उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्स यादीमध्ये येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार तथा डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्सची निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि करिअर कट्ट्याचे समन्वयक यांचा सन्मान दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी बारामती येथे उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व निधीचा धनादेश देऊन होणार आहे.
स्वायत्त दर्जा प्राप्त डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स विद्यार्थ्यांच्या करिअर करता सतत प्रयत्नशील असते. त्यांच्या या कामाची दखल घेऊन कॉलेजची सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, समन्वयक डॉ. एस. एस. देसाई व रोनीत खराडे यांचे अभिनंदन होत आहे. कॉलेजच्या या उपक्रमास कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम व संचालक ॲड. वैभव पेडणेकर आणि ॲड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.









