सांगरुळ, वार्ताहर
Kolhapur News : राजकारण समाजकारण आणि व्यक्तिगत जीवनात काम करत असताना अनेक अडचणी येत असतात.यावेळी खचून न जाता क्षेत्र कोणतेही असो प्रामाणिक व चिकाटीने प्रयत्न केल्यास आपण नक्की यशस्वी होऊ शकतो असे प्रतिपादन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.सांगरुळ (ता करवीर) येथे राजर्षी शाहु नाळे तालीम मंडळ आणि ग्रामपंचायत सदस्य सुशांत नाळे यांच्या वतीनं वसा समाज सेवेचा..गौरव यशवंतांचा या कार्यक्रमा अंतर्गत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना शाहू पुरस्कार देऊन तर सेवानिवृत्त व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा व शालेय साहित्य वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत बँकेचे माजी संचालक शिवाजीराव खाडे होते.
यावेळी आसगावकर म्हणाले, पैसा अनेक लोकांच्याकडे असतो पण दातृत्व फार कमी लोकांकडे असते. सुशांत नाळे सारख्या ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून गावात कोट्यावधी रुपयाची विकास कामे करून गावातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व अनेक ठिकाणी निवडी झालेल्या लोकांचा गौरव करण्याचे काम प्रेरणादायी आहे. हे सर्व काम स्वखर्चाने व निस्वार्थी भावनेने करत असल्याने अशा समाजाभिमुख काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देण्याची गरज असल्याची सांगितले.
यावेळी चंद्रदीप नरके म्हणाले, सुशांत नाळे यांनी गेल्या काही वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे कुस्ती मैदान घेण्याची परंपरा सुरू केली आहे. यामुळे परिसरातील मल्लांना कुस्तीसाठी चालना मिळाली आहे. गावातील ज्येष्ठ मल्लांचा सत्कार गावातील वैवाहिक जीवनातील ७५ वर्षे पूर्ण झालेल्या दापत्यांचा सत्कार सोहळा, मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी असेल असे विविध कार्यक्रम निस्वार्थी भावनेने काम करणाऱ्या या प्रामाणिक कार्यकर्त्याला येत्या काळात आपण मोठी ताकद देणार असल्याचेही नरके यांनी सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक सागर कासोटे यांनी केले .यावेळी डीवायएस पी. सरदार नाळे,उद्योजक भगवानराव लोंढे ,तरुण भारतचे पत्रकार गजानन लव्हटे,उमेश फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे ,अध्यापक राजू अत्तार मंडल,अधिकारी सुहास घोदे,तलाठी काटकर ,ग्रामसेवक अमोल काजवे, प्रगतशील शेतकरी हिंदुराव खाडेयांना शाहू पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच विविध संस्थांवर निवड झालेल्या पदाधिकारी व शिक्षक तसेच सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके रयत सेवा संघाचे चेअरमन सचिन पाटील, कुंभीचे माजी उपाध्यक्ष निवास वातकर, संचालक रविंद्र मडके,राहुल खाडे, कुंभी बँकेचे संचालक प्रा.एस.पी, चौगले सदाशिव खाडे, दिलीप खाडे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .एन. आर. सणगर यांनी सूत्रसंचालन केले.आभार दत्त दूध संस्थेचे चेअरमन विलास नाळे यांनी मानले.