डिजिटल डिस्प्लेसह ड्युअल डिस्क ब्रेकसह अन्य सुविधा : सुरुवातीची किंमत 1.17 लाख रुपये राहणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया यांनी भारतात नवीन एसपी 160 ही गाडी सादर केली आहे. जिची सुरुवातीची किंमत ही 1.17 लाख रुपये एक्स शोरुम राहणार असल्याची माहिती आहे. कंपनीच्या या स्पोर्टी दुचाकीमध्ये डिजिटल सुविधांसह क्लस्टर आणि डबल ब्रेक सारखी फिचर्स देण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
सदरची दुचाकी ही दोन प्रकारांमध्ये उपलब्ध होणार असून याच्या सिंगल डिस्क ब्रेक असणाऱ्या गाडीची किंमत ही 1,17,500 रुपये तर डबल डिस्क ब्रेकच्या गाडीची किमत ही 1,21,900 रुपये राहणार आहे. दोन्ही मॉडेल्सची डिलिव्हरी चालू महिन्याच्या अखेरीला सुरु होणार असल्याचेही सांगितले आहे.









