वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया यांनी आपली नवी डिओ 125 स्कूटर नुकतीच बाजारात लाँच केली आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 83 हजार 400 रुपये इतकी असणार असल्याची माहिती आहे. याआधी डिओ ही गाडी 110 सीसी इंजिनसह उपलब्ध होत होती. जी आता 125 सीसी इंजिनसह बाजारात दाखल झाली आहे. साइड स्टँड इंडिकेटर व आयडलिंग स्टॉप सिस्टम ही वैशिष्ट्यो यात आहेत.
दोन प्रकारात येणार
स्टँडर्ड आणि स्मार्ट या दोन प्रकारात डिओ गाडी उपलब्ध करण्यात आली आहे. ग्रेझीया व अॅक्टीव्हा 125 प्रमाणेच या गाडीचे इंजिन असून फ्रंट डिस्क ब्रेक, रिअर ड्रम ब्रेक, टेलिस्कोपिक फोर्क/मोनोशॉक सेटअप व 177 एमएम ग्राउंड क्लिअरन्ससह गाडी येणार आहे. एकंदर 10 वर्षाची वॉरंटी या गाडी खरेदीवर ग्राहकांना मिळणार असल्याचे समजते. स्टँडर्डची किंमत 83 हजार 400 रुपये एक्सशोरुम आणि स्मार्टकरीता 91 हजार 300 रुपये किंमत असेल.









