किंमत 10.99 लाख रु. : पुढील महिन्यात डिलिव्हरी
नवी दिल्ली
हिरो मोटरसायकल इंडिया यांनी भारतात अॅडव्हेंचर टूर बाइक एक्सएल750 ट्रान्सलॅप एडिव्ही सादर केली आहे. ऑफ रोडिंग बाईकच्या पहिल्या 100 युनिट्सचे बुकिंग सुरु झाले असून पुढील महिन्यात डिलिव्हरी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदरची गाडी ही रॉस व्हाईट आणि मॅट बॅलिस्टिक ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायामध्ये उपब्लध होणार आहे. संपूर्ण बिल्ट युनिट जपानमधून येणार असून प्रीमियम बिगविंग टॉपलाइन डीलरशिपद्वारे विकण्यात येणार आहे. ट्रान्सलॅप डायमंड स्टील फ्रेमवर विकसित केली आहे. आरामदायी राइडिंगसाठी समोर शोवा 43 एमएम युएसडी फोर्क व मागील बाजूस मोनोशॉक सेटअप आहे.









