मुंबई
होंडा कंपनी 2030 पर्यंत 30 इलेक्ट्रिक कार्स बाजारात दाखल करणार आहे. यामध्ये व्यावसायिक मिनी इलेक्ट्रिक वाहनांसह इतर मॉडेल्सचा समावेश असणार आहे. कंपनी येत्या काळामध्ये आपल्या उत्पादनामध्ये 20 लाख वाहनांची अधिकची भर घालणार आहे. यासाठी कंपनी येणाऱया काळामध्ये 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे. पुढील 10 वर्षांच्या काळामध्ये इलेक्ट्रिक प्रणाली आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाच्या विकासावर जास्तीतजास्त भर दिला जाणार आहे. संशोधन आणि विकासासाठीही गुंतवणुकीचा काही भाग वापरला जाणार आहे. कंपनी आपल्या वाहनामध्ये लिक्विड लिथियम आयन बॅटरीचा समावेश करण्यासाठी येत्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे. जनरल मोटर्स यांच्या सहकार्याने होंडा 2027 पर्यंत अफोर्डेबेल इलेक्ट्रिक वाहने सादर करण्याची योजना आखत आहे.









