ओबीडी 2 सुसंगत इंजिनसह गाडी देणार 55 किलोमीटरचे मायलेज
नवी दिल्ली :
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया यांनी अपडेटेड होंडा शाईन 125 हे मॉडेल भारतीय बाजारात सादर केले आहे. शाईन125 हे ओबीडी 2 नियमानुसार अपडेट केले आहे. ज्यामुळे दुचाकी 55 किमी इतके मायलेज देऊ शकणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
सदरची दुचाकी ही पेट्रोलवर चालणार आहे. याशिवाय, वाहन निर्मिती कंपनीने दुचाकीला जवळपास 10 वर्षांची वॉरंटी दिली आहे. ज्यामध्ये 3 वर्षांची मानक वॉरंटी आणि 7 वर्षांची पर्यायी वॉरंटी समाविष्ट आहे.
होंडा शाईन 125 कंपनीने दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केले आहे. शाईन 125 ड्रम-ओबीडी 2 ची किंमत 79,800 रुपये राहणार आहे आणि शाइन 125 डिस्क-ओबीडी2 ची किंमत ही 4 हजार रुपये जास्त असणार आहे. त्याच वेळी, बाइक जुन्या मॉडेलपेक्षा 1,123 रुपयांनी महाग झाली आहे. ही बाइक कॉम्प्युटर मोटरसायकल सेगमेंटमध्ये 5 रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात ब्लॅक, जेनी ग्रे मेटॅलिक, मॅट अॅक्सिस ग्रे, रिबेल रेड मेटॅलिक आणि डिसेंट ब्लू मेटॅलिक रंगांचा समावेश आहे.









