नवी दिल्ली
होंडा कार्स इंडियाने भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी आपल्या नवीन कारचे अनावरण करणार आहे. सदरचे सादरीकरण हे 6 जून 2023 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भारतीय बाजारातील ही कंपनीची पहिली मध्यम आकाराची एसयूव्ही असणार आहे. या सेगमेंटमधील कार ही ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टास, मारुती सुझुकी, ग्रेट विटारा, फॉक्सकॉन टियागो, स्कोडा कुशक आणि टोयोटा अर्बन या सारख्या कार्ससोबत स्पर्धा करणार आहे.
माध्यमाच्या अहवालानुसार भारतात होंडा कार्सने 2021 मध्ये इलेव्हट नावाने ही कार रजिस्टर केली होती. या नावाने ही कार भारतीय बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या एसयूव्हीची किंमत अंदाजे 12 ते 19 लाख रुपयांच्या दरम्यान राहणार असल्याची माहिती आहे. तसेच ऑगस्टमहिन्यात ही कार विक्रीला येणार असल्याची माहिती आहे.









