वृत्तसंस्था /नवी दिल्ली
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया यांनी अद्ययावत स्ट्रीट फायटर दुचाकी सीबी 300 एफ सादर केली आहे. या गाडीला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. तर याचे डिझाईन हे इंटरनॅशनल बिग बाइक येथून करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी या दुचाकीत डबल चॅनेल एबीएस ब्रेकिंग सिस्टीम आहे. 300 सीसी सेगमेंटमध्ये दुचाकी अपाचे आरटीआर 310 सोबत स्पर्धा करणार आहे. ही गाडी डिलक्स प्रो प्रकारात असून तीन रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. यात स्पोर्ट्स रेड, मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक आणि मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक रंगाचा समावेश आहे. दुचाकीची किंमत 1.7 लाख रुपये आहे.
इंजिन व पॉवर
नवीन होंडा सीबी300 एफमध्ये 293 सीसी सिंगल सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. जे 24 बीएचपी पॉवर आणि 25.6 एनएम टॉर्क जनरेट करते.









