मुंबई
: मामाअर्थ यांची सहकारी कंपनी होनासा कन्झुमर यांचा आयपीओ मंगळवार दि. 31 ऑक्टोबर रोजी बाजारात खुला झाला आहे. सदरचा आयपीओ गुंतवणुकीसाठी 2 नोव्हेंबरपर्यंत खुला राहणार असल्याची माहिती आहे. आयपीओ अंतर्गत कंपनीने समभागाची किंमत 308-324 रु. प्रति समभाग अशी निश्चित केली आहे. या आयपीओ अंतर्गत कंपनी 365 कोटी रुपयांचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर करणार आहे.









