मुंबई
मामाअर्थची सहकारी कंपनी होनासा कंझ्युमर यांचा आयपीओ दिवाळीपूर्वी बाजारात सादर करण्याची योजना असून या आयपीओतून कंपनी 1700 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा विचार करते आहे. यासंदर्भातला रितसर अर्ज कंपनीने बाजारातील नियामक सेबीकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. आयपीओअंतर्गत 400 कोटी रुपयांचे ताजे समभाग कंपनी सादर करणार आहे. सौंदर्य आणि वैयक्तिक काळजी घेणारी उत्पादनांची सेवा डिजिटल माध्यमातून ही कंपनी पुरवते.









