विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
सांखळी : कुडणे येथील श्री देवी महालक्ष्मी कुडणेश्वर देवस्थानात साजरा होणारा वार्षिक होमकुंड जत्रोत्सव सोमवार दि. 10 रोजी पासून सुरू होणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 5.30 ते दुपारी 1 वा. पर्यंत श्रींच्या मूर्तीस अभिषेक, संध्या. 4 वा. नवीन धोंडगण मानवणे, 6 वा. श्रींचे सातेरी देवीच्या तळीवर स्नान करण्यासाठी आगमन, रात्री 11 वा. हरवळे येथील श्री देव ऊद्रेश्वराकडून भेटीच्या रुपाने आलेली फळे फुलांसह आलेल्या ओटी स्वीकारणे, पहाटे 2 वा. होमकुंड मंत्राग्नी प्रज्वलित करून धोंडगणांचे स्नान करण्यासाठी सातेरीदेवीच्या तळीवर प्रस्थान. पहाटे 4 वा. श्री रवळनाथ व देवी महालक्ष्मीच्या कृपाप्रसादाने धोंडगणांचा हुमकुंडातून अग्निदिव्य करत प्रवेश. पहाटे 5:30 वा. श्रींचे अग्निदिव्य व नंतर मंडपात सर्वांना कौल दिला जाईल. मंगळवार दि. 11 रोजी रात्री 11 वा. श्रीमंत दामोदरपंत नाटक, बुधवार दि. 12 रोजी रात्री 11 वा. अयोध्येचा ध्वजदंड हे नाटक सादर होईल. गुऊवार दि. 13 रोजी रात्री 11 वा. ‘वन टू का फोर’ हे कोकणी नाटक तर शुक्रवार दि. 14 रोजी संध्या. 7 वा. श्री कुडणेश्वर नूतन मंदिर बांधकामासाठी काढण्यात आलेल्या मदतनिधी कुपनचा निकाल जाहीर केला जाईल. तद्नंतर ऑर्केस्ट्रा सादर होणार आहे, असे देवस्थानतर्फे कळविण्यात आले आहे.
गोबी मॅच्युरीवर बंदी
श्री देव कुडणेश्वर जत्रोत्सव निमित्ताने कुडणे येथे भरणाऱ्या फेरीत गोबी मंच्युरी या खाद्यपदार्थांवर श्री महालक्ष्मी कुडणेश्वर पंचायतन कार्यकारिणी समितीतर्फे बंदी घालण्यात आली आहे. बंदी घातलेली असतानाही जर कुणी आपले दुकान थाटले असल्याचे दिसून आल्यास ते दुकान तत्काळ बंद केले जाईल, असा निर्णय समितीतर्फे घेण्यात आला आहे.









