तरुणभारत ऑनलाइन टीम
आजकाल केस गळणे,केस विरळ होणे,केसात कोंडा होणे अशा अनेक समस्या प्रत्येकालाच भेडसावत असतील. अनेकजण केसगळती थांबवण्यासाठी ववेगळ्याप्रकारचे शाम्पू ,तेल वापरतात. पण काही काही वेळेला याचे दुष्परिणाम देखील जाणवायला लागतात. म्हणूनच आम्ही तुम्हाला घरच्या घरी आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची केसगळती थांबेलच शिवाय केस लांब आणि मुलायम देखील होतील.
हे घरगुती तेल बनवण्यासाठी एक लिटर खोबरेल तेल घ्या. त्यात १०० मिली तिळाचे तेल,५० मिली एरंडेल तेल,एक मोठी वाटी ब्राम्ही आणि म्हाक्याची पानं ,छोटी वाटी आवळा आणि मेथीचे दाणे त्यात टाका. त्याबरोबरच कडुलिंब, कडीपत्ता,जास्वंदीची फुलं आणि पानं ,कोरफडीचा गर ,आणि शिकेकाई या सगळ्या वनस्पती समप्रमाणात घेऊन हे सगळे पदार्थ मंद आचेवर गरम करावेत. उकळी आल्यानंतर हे तेल थंड होऊ द्या पण उकळताना हे पदार्थ करपणार नाहीत याची काळजी घ्या. थंड झालेलं तेल झाकून ठेवा यामुळे सगळ्या वनस्पतींमधील अर्क तेलात उतरेल.जर तुम्हाला वनस्पती मिळाल्या नाहीत तर तुम्ही रेडिमेड पावडर देखील वापरू शकता.हे आयुर्वेदिक तेल आठवड्यातून तीनवेळा लावल्यास केसगळती कमी होऊन केसांची वाढ होऊ शकते. त्याच बरोबर टक्कल पडणे,कोंडा होणे केस पांढरी होणे यावे हे तेल परिणामकारक ठरतं.