पायावरील काळवंडलेल्या त्वचेमुळे आपल्या पायांचे सौंदर्य खराब दिसू शकते. पण बऱ्याच हे टॅनिंग कसं घालवायचं हे आपल्याला माहित नसते. यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन यावर उपाय करतो किंवा बाजारतील महागड्या क्रीम्स वापरतो. यावर घरच्या घरी देखील उपाय होऊ शकतो. चला तर मग पाहुयात यावर घरगुती उपाय काय आहेत.
कोरफड जेल हाता-पायाला लावा. ५ मिनिटे मसाज करा आणि ३० मिनिटांनी पाण्याने हात-पाय स्वच्छ धुवा.यामुळे त्वचा तेजस्वी होते.
हळदीत कच्चे दूध मिसळा आणि त्वचेवर लावा. नक्कीच फायदा होईल.
संत्र्याच्या साली वाळवून घ्या आणि त्याची वाटून पावडर करा. त्या पावडरमध्ये दही घाला आणि पेस्ट हाता-पायाला लावा. यामुळे टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.
टॉमेटो काळवंडलेल्या त्वचेवर रगडा. टोमॅटोमध्ये असणाऱ्या लायकोपेन अँटीऑक्साइड मुळे त्वचा स्वच्छ होते आणि त्वचेचा रंग उजळतो. असे नियमित केल्याने हाता-पायाच्या त्वचेवर चमक येईल.
चंदन पावडरमध्ये लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घालून पेस्ट बनवा. त्वचेवर लावा. १५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ करा. त्वचा उजळण्यास मदत होईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









