सौंदर्यप्रसाधने किंवा पार्लरसाठी दर महिन्याला किती पैसे खर्च करायचे असा प्रश्न प्रत्येक स्त्री स्वत:ला करते. याचे प्रमुख कारण म्हणजे फेशियल, मेनिक्युअर-पेडिक्युअरसाठी खूप पैसे खर्च करावे लागतात. दर महिन्याला सतत पैसे खर्च करण्य़ापेक्षा घरच्या घरीच तुम्ही घरातील साहित्याचा वापर करून मेनिक्युअर करू शकता. यासाठी पैसेही खर्च करावे लागणार नाहीत. आणि पार्लरसारखा फिल तुम्हाला घरीच अनुभवायला मिळेल. चला तर जाणून घेऊया काही टिप्स.
साहित्य
तांदळाचं पीठ
काॅफी
हळद
साखर
लिंबू
एक्पोलिटर टूल
नेलपेंट रिमोव्हर
हॅन्ड क्रिम
काॅटन
गरम पाणी
पॅक असा तयार करा
तांदळाच पीठ, काॅफी आणि हळद मिक्स करून पॅक तयार करा.
कृती
सुरवातीला आपल्या हातावरील नेलपेंट काढून घ्या. त्यानंतर नखांना आकार द्या. सुरुवातीला साईटनी नखांना फाईल (नखांना शेफ देणे) करून घ्या. नखांच्या खालील साईटने फाईल करून घ्या. त्यानंतर नखांना काॅटन बाॅलने गुलाबपाणी लावून घ्या. ही स्टेप झाल्यानंतर नखांना शाईन येण्यासाठी बफरचा वापर करा. आता थोड्य़ा कोमट पाण्यात लिंबू पिळा, थोडा शाम्पू टाका या पाण्यात १० मिनिटे हात बुडवून तसेच ठेवा. त्याननंतर क्विटकल क्रिम लावा. किंवा हॅंड किंवा नेल क्रिम लावा. यानंतर नेलपुशर टूलचा वापर करून नखे क्लिन करून घ्या. डेडस्किन काढण्यासाठी याचा वापर होतो. हे टूल नसतील तर नेलशेफरचा वापर करा. आता यानंतर साखरेत लिंबू पिळा आणि हाताला स्क्रब करा. लिंबुने हातावर चोळून घ्या. यानंतर हात स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर पॅक लावा आणि १० मिनिटे पॅक ठेवा यानंतर हात वाॅश करून घ्या. आता नखांना नेलपेंन्ट कोट लावून घ्या. त्यानंतर नेलपेन्ट लावा. नेलपेन्ट लावल्यानंतर टाॅपकोट लावा. घरच्या घरी कमी वेळेत तुम्ही मेनिक्युअर करू शकता. दहा दिवसातून एकदा तुम्ही असे मेनिक्युअर करू शकता.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









