राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्यातील महिला अचानक गायब होण्य़ाच प्रमाण वाढले आहे. तसेच राज्य़ात जातीय तेढ निर्माण होऊन दंगली निर्माण होत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजकिय वक्तव्य करण्यापेक्षा या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहीजे असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नैराशेतून असे वक्तव्य करत असून ते मणिपूरकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मुंबईत आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “शिंदे फडणवीस सरकारला एक वर्षे झाली आहेत. तरीही राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात मुलींवर हल्ले होत असून महिलांचे गायब होण्याचे प्रमाणही वाढत आहे. 14 जिल्ह्यातून वर्षभरात 4 हजार 431 महिला बेपत्ता झाल्या आहेत. हा खुपच गंभिर प्रश्न आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजकिय वक्तव्य करण्याएवजी या सर्व प्रश्नाकडे लक्ष घातले तर बरे होईल.” असा सल्ला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
पुढे बोलताना त्यांनी समान नागरी कायद्यावर आपली भुमिका मांडली, “देशाच्या पंतप्रदनांनी समान नागरी कायद्यावर भाष्य केले आहे. या प्रकरणात केंद्र सरकारला शिख आणि जैन समुदायाला दुर्लक्षित करून चालणार नाही. या कायद्याची विधी आयोगाकडून संपुर्ण माहीती घेऊनच राष्ट्रवादी त्यावर भुमिका स्पष्ट करेल. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पंप्रधानांकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत.” असे ते म्हणाले.








