कर्नाटकातील (Karnataka) मुस्लिमांचे 4 टक्के ओबीसी आरक्षण हटवल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांनी रविवारी काँग्रेसवर (Congress) ताशेरे ओढले आणि धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची राज्यघटनेत तरतूद नसून अशा प्रकारचे आरक्षण कॉंग्रेसकडून दिला गेल्याचा आरोप अमित शहा यांनी केला.
कर्नाटक दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शहा यांनी ‘गरोटा शहीद स्मारक’ आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. तसेच त्यांनी कर्नाटकात 103 फूट उंच राष्ट्रध्वजाचे अनावरणही केले. तसेच ओबीसी मुस्लिमांना 10 टक्के आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग (EWS) श्रेणीत आरक्षण देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कर्नाटकात एका जाहीर सभेला संबोधित करताना गृहमंत्री शाह म्हणाले, “अल्पसंख्याकांना दिलेले आरक्षण हे संविधानानुसार नव्हते. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची घटनेत तरतूद नाही. काँग्रेस सरकारने ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे अल्पसंख्याकांना आरक्षण दिले. भारतीय जनता पक्षाने () ते आरक्षण रद्द करून ते वोक्कलिंगा आणि लिंगायत समुदायांना दिले आहे.”