नव्या योजनेच्या अंतर्गत मिळणार लाभ
स्वतःचे एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु वाढत्या महागाईदरम्यान घर खरेदी करणे सर्वांनाच शक्य होत नाही. माणूस स्वतःचे घर खरेदी करण्यासाठी आयुष्यभर बचत करत असतो. तसेच स्वस्त घरांच्या योजनेच्या प्रतीक्षेत असतो. विदेशात अशाच एका योजनेच्या अंतर्गत अत्यंत कमी किमतीत घर खरेदी करता येणार आहे. हेल्प टू बाय स्कीम अंतर्गत वॉल्वरहॅम्प्टनमध्ये केवळ 99.67 रुपयांच्या किमतीत घर खरेदीची संधी मिळत आहे.

स्वस्त घर खरेदी करणाऱया एका व्यक्तीने या नव्या योजनेची प्रशंसा केली आहे. इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड्सच्या वॉल्वरहॅम्प्टन सिटीत हेल्प टू बाय स्कीमच्या अंतर्गत 2, 3 अणि 4 बेडरुम्सयुक्त घरांची विक्री केली जात आहे. हे घर रहिवाशांना 25 वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतल्यावर खरेदी करण्याची अनुमती मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत एक लॉयल्टी प्रीमियम निश्चित केला जाणार आहे. त्यानंतर कुणीही हे घर केवळ 99.67 रुपयांमध्ये खरेदी करू शकतो. या योजनेच्या अंतर्गत 100 घरांची निर्मिती करण्यात आली आहे.
हेल्प टू बाय स्कीम
प्रारंभीच्या 20 वर्षांमध्ये योजना सोडल्यास भाडेकरू स्वतःचा प्रीमियम रोख स्वरुपात मिळवू शकणार आहे. बांधकाम कंपनी विलमॉट डिक्सन 266 घरांची निर्मिती करत आहे, यातील काही घरे सध्या निर्माणाधीन स्थितीत आहेत. हेल्प टू ओन योजना विशेषकरून कष्टाळू लोक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी तयार करण्यात आली आहे. स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणाऱया कुटुंबांना यातून लाभ मिळवून देण्यात येत आहे.









