बेळगाव प्रतिनिधि – रघुनाथ पेठ अनगोळ येथे शुक्रवारी दुपारी घर कोसळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली.अचानक घडलेल्या घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नाही हे घर प्रकाश महादेव होळकर या भाजी विक्रेत्याच्या मालकीचे आहे. रघुनाथ पेठ येथे असणारे होळकर यांचे जुने घर अलीकडच्या मुसळधार पावसामुळे कमकुवत बनले होते. शुक्रवारी दुपारी भाजी विकण्या निमित्त प्रकाश होळकर हे घराबाहेर गेले होते, तर पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. घरामध्ये प्रकाशची आई आपल्या मुली सोबत गप्पा मारत बसली होती. अचानक घराच्या छताची माती कोसळायला लागल्यामुळे घाबरून प्रकारची आई व मुलगी घराबाहेर धावत गेली. त्यानंतर काही क्षणात दुपारी दोनच्या सुमारास आतील बाजूने घर कोसळायला सुरुवात झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीहि जीवित हानी झाली नाही . परंतु प्रकाश होळकर यांचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. घरगुती साहित्यसह, घरातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक व तलाठी यांनी घटनास्थळी भेट घेतली सदर घटनेची नोंद टिळकवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









