वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला हॉकी संघाची स्ट्रायकर दीपिका हिने 2024-25 एफआयएच प्रो लीगच्या भुवनेश्वर टप्प्यात नेदरलँड्सविऊद्ध केलेल्या फील्ड गोलसाठी पोलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे.
पोलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार हा प्रो लीगमधील सर्वांत सर्जनशील आणि कौशल्यपूर्ण क्षणांचा सन्मान करत असतो आणि जगभरातील चाहत्यांकडून त्यासाठी मतदान केले जाते. जगात अव्वल क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात वरील 21 वर्षीय आक्रमक खेळाडूने मारलेली मुसंडी आणि 35 व्या मिनिटाला केलेला गोल हा तिला जागतिक स्तरावर गाजवून गेला. भारताने 2-2 अशा बरोबरीनंतर त्यात शूटआउटमध्ये विजय मिळवला.
भारत 0-2 असा पिछाडीवर असताना दीपिका, जी एक उत्कृष्ट ड्रॅगफ्लिकर आहे, तिने डाव्या बाजूने डच बचावफळीला भेदत चेंडू पुढे नेला, बेसलाइनवर ड्रिबल केला आणि डच बचावपटूच्या स्टिकवरून चेंडू काढत नंतर गोलरक्षकाला चकविले. यामुळे त्या सामन्यात भारताचे खाते खुलले. ‘हा पुरस्कार मिळाल्याने मी खरोखरच सन्मानित झाले आहे. नेदरलँड्ससारख्या आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्याविऊद्ध गोल करणे हा माझ्यासाठी खरोखरच एक खास क्षण होता आणि आता हा सन्मान मिळणे खूप अर्थपूर्ण आहे. मी माझ्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक, कुटुंबीय आणि मित्रांचे आभार मानते, जे मला दररोज पाठिंबा देत राहतात आणि प्रेरणा देत राहतात, असे दीपिकाने म्हटले आहे.
हा पुरस्कार फक्त माझा नाही, तर तो भारतीय हॉकीचा आहे. एकत्रितपणे पुढे जात राहूया, असे दीपिकाने म्हटले आहे. दीपिकाचा गोल हा स्पेनची पॅट्रिशिया अल्वारेझ आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघासह तीन महिला नामांकनांपैकी एक होता. पुऊष गटातील पुरस्कार बेल्जियमच्या व्हिक्टर वेग्नेझने त्याच्या मिडफिल्डमधील अप्रतिम कामगिरीच्या जोरावर पटकावला आहे. सदर कामगिरीमुळे स्पेनविऊद्ध संघाला गोल नोंदवता आला होता.









