वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हॉकी इंडियातर्फे बेंगळूरच्या साई केंद्रामध्ये भारताच्या पुरुष वरिष्ठ हॉकी संघासाठी सराव शिबिर आयोजित केले असून या शिबिरासाठी 36 हॉकीपटूंची निवड करण्यात आली आहे. हे शिबिर मंगळवारपासून सुरु होणार असून ते 28 मार्चपर्यंत चालणार आहे.
या शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या हॉकीपटूंमध्ये गोलरक्षक कृष्णन बहाद्दुर पाठक, पवन, सूरज करकेरा, मोहित शशिकुमार, जर्मनप्रित सिंग, अमित रोहिदास, सुमीत, संजय, जुगराज सिंग, अमनदीप लाक्रा, निलम संजीव झेस, वरुण कुमार, यशदीप सीवाच, राजकुमार पाल, समशेर सिंग, मनप्रित सिंग, हार्दिक सिंग, विवेकसागर प्रसाद, निलकांत शर्मा, एम. रवीचंद्र सिंग, मोहम्मद मुसेन, विष्णूकांत सिंग, राजींदर सिंग, सी.बी. पुवन्ना, अभिषेक, सुखजीत सिंग, उपाध्याय, गुरजंत सिंग, अंगडबिर सिंग, आदित्य लालगे, बॉबी सिंग, सुदीप चिरमाको, एस. कार्ती, शिलानंद लाक्रा, दिलप्रति सिंग आणि उत्तम सिंग यांचा समावेश आहे.









