वृत्तसंस्था/ रांची,
राष्ट्रीय 64 व्या खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत सर्व्हिसेसच्या मणिकांता होबलीधरने 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्यासाठी आपली वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि राष्ट्रीय विक्रम मागे टाकला.
या 24 वर्षीय आर्मी स्प्रिंटरने 10.19 सेकंदांची वेळ नोंदवून 2023 मध्ये बेंगळूरमध्ये प्रस्थापित केलेल्या 10.23 सेकंदांच्या स्वताच्या स्पर्धाविक्रमात सुधारणा केली. होबलीधरने अंतिम रेषा ओलांडताना आनंदाने हात वर केले. तथापि, त्याची विजयी वेळ अनिमेश कुजूरच्या 10.18 सेकंदांच्या राष्ट्रीय 100 मीटर विक्रमापेक्षा कमी पडली. महाराष्ट्राचा 24 वर्षीय प्रणव गौरव 10.31 सेकंदांसह दुसऱ्या आणि 21 वर्षीय सर्व्हिसेसचा हर्ष राऊत 10.38 सेकंदांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महिलांच्या 100 मीटर शर्यतीत कर्नाटकच्या स्नेहा एसएसने विजेतेपद पटकावले. तिचा विजयी वेळ 11.62 सेकंद होता.
पुरुषांची 400 मीटर शर्यत देखील एक मोठे आकर्षण होते. थोड्या विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या ऑलिम्पिक राजेश रमेशने 45.75 सेकंदांच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरीसह विजय मिळवला. महिलांच्या 400 मीटर शर्यतीत उत्तर प्रदेशच्या नीरू पाठकने 52.85 सेकंद वेळ नोंदवली. रेल्वेच्या ओलिंबा स्टेफीने 53.75 सेकंद वेळ नोंदवून दुसरे तर कर्नाटकच्या प्रिया मोहनने 54.04 सेकंद वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले.
महिलांच्या उंचउडीत तामिळनाडूच्या गोबिकाला सुवर्णपदक मिळविताना 1.79 मीटर उंच उडी टाकली. शेवटच्या उडीत उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्पर्धेत महिला शॉटपुट स्पर्धेत तिच्या राज्य किटसह न आल्याने तिला स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली.









