आयपीएलमध्ये 16 वेळा शुन्यावर बाद
वृत्तसंस्था/ चेन्नई
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना झाला. यावेळी चेन्नईविरुद्ध लढतीत रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही, आणि त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कॅमरून ग्रीन आणि ईशान किशन आले. मुंबईला पहिला धक्का दुसऱ्या षटकात बसला. मात्र, तो या अपेक्षांवर खरा उतरला नाही. रोहितने यावेळी फक्त 3 चेंडूंचा सामना केला. यावेळी त्याला एकही धाव काढता आली नाही. रोहित शून्यावर बाद होण्याची ही सलग दुसरी वेळ होती. मागील सामन्यात पंजाब किंग्सविरुद्धही खेळताना रोहित 3 चेंडू खेळून शून्यावर झेलबाद झाला होता. आता चेन्नईविरुद्ध शून्यावर बाद होताच त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित अव्वलस्थानी विराजमान झाला. आयपीएलमध्ये रोहित शर्मा 16 वेळा शून्यावर बाद झाला. रोहितपाठोपाठ या यादीत दुसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या दिनेश कार्तिक, सुनील नारायण आणि मनदीप सिंग हे खेळाडू आहेत. हे तिघेही 15 वेळा शून्यावर बाद झाले होते.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे खेळाडू
16 रोहित शर्मा
15 दिनेश कार्तिक
15 सुनील नारायण
15 मनदीप सिंग
14 अंबाती रायुडू









