मालवण : प्रतिनिधी
सन 2022-23 या या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित,ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थीनी कुमारी भूमिका सदानंद कोचरेकर, हिला गुणवत्ता यादीत स्थान मिळून शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे. याच वर्षी घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस. (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा) या परीक्षेत तिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्ती मिळवली होती. एकाच वर्षात दोन शिष्यवृत्ती मिळवणारी ती शाळेच्या इतिहासातील पहिलीच विद्यार्थीनी आहे. शाळेची गुणवत्ता आणि उज्वल यशाची परंपरा कायम राखत एक उपक्रमशील शाळा म्हणून ओझर विद्यामंदिरच्या नावलौकिकात वाढ केल्याबद्दल आणि तिच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्था, शालेय समिती,मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्वांनी तिचे हार्दिक अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.









