करवीर राज्य संस्थापिका मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न
कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथं पार पडला प्रकाशन सोहळा
कोल्हापूर
इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित हिंदवी स्वराज्य – रक्षिका , करवीर राज्य संस्थापिका मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या संशोधनात्मक चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथं पार पडला. हा प्रकाशन सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर , वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ , खासदार धैर्यशील माने ,खासदार धनंजय महाडिक, संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे.
याप्रसंगी बोलताना इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी ताराराणींच्या शौर्यगाथेला उजाळा देत पन्हाळा गडावर त्यांच स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी केली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पन्हाळा गडावर छत्रपती ताराराणींच स्मारक उभारण्यात येईल अशी ग्वाही उपस्थितीतांना दिली आहे.
तर सर्वांनी छत्रपती ताराराणींची स्फूर्ती घेवून काम केलं तर महाराष्ट्र वरच्या टोकाला पोहचेल.. आणि महाराष्ट्राला पुन्हा मॉडेल म्हणून संबोधले जाईल असं मत खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं..
याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना छत्रपती ताराराणींच्या पराक्रमावर आणि शरद पवार आणि कोल्हापूर यांच्या ऋणानुबंधावर प्रकाशझोत टाकला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








