पुरुषाचे स्त्रीवर किंवा स्त्रीचे पुरुषावर प्रेम जडणे नैसर्गिक पूर्वापारपासून नैसर्गिक मानले जात आहे. तथापि, अमेरिकेच्या अर्कान्सास प्रांतात राहणाऱ्या नथानिएल नामक पुरुषाचे त्याच्या कारवर प्रेम आहे. हे प्रेम म्हणजे केवळ आपुलकी नाही. तर तो कारलाच आपली प्रेयसी मानतो आणि तशाच प्रकारे तिच्याशी संबंध ठेवतो, असे त्याचे म्हणणे आहे. अमेरिकेत अशी पद्धत आहे की, साधारणपणे दोन-तीन वर्षांनंतर कार बदलली जाते. नव्या मॉडेलची कार घेतली जाते. तथापि या पुरुषाने आपली कार गेली 25 वर्षे तीच ठेवली आहे. हा कदाचित अमेरिकेतील विक्रमच असावा. अमेरिकेत विवाहही इतकी वर्षे टिकत नाहीत. पण याचे आपल्या कारवर इतके प्रेम आहे, की त्याने तिला मुळीच सोडलेले नाहीं.
नथानिएल 37 वर्षांचा आहे. तो 12 वर्षांचा असताना या कारच्या सान्निध्यात आला. काही वर्षांनंतर त्याचे या कारवर प्रेम जडले. प्रियकर प्रेयसीची घेणार नाही, अशी तो तिची चिंता करतो. तिची सेवाही करतो. प्रारंभी त्याने आपले हे प्रेमप्रकरण गुप्त ठेवले होते. पण गेल्या काही वर्षांपासून त्याने ते उघड केले असून सोशल मिडियावर त्याच्या या जगावेगळ्या प्रेमाची चर्चा आहे. अनेक लोक त्याला मूर्खही समजतात. पण त्याने आपले एकनिष्ठ प्रेम जपलेले आहे.









