वार्ताहर /कुद्रेमनी
येथील शिवराज स्पोर्ट्स व बलभीम युवक मंडाळाच्यावतीने नुकताच झालेल्या कुद्रेमनी प्रिमियर लीग 2024 क्रिकेट स्पर्धेत हिंदवी स्पोर्ट्स कुद्रेमनी क्रिकेट संघाने प्रथम क्रमांकाचे 11001 रु. बक्षीस मिळविले. द्वितीय क्रमांकाचे सात हजार रुपयांचे बक्षीस सरकार स्पोर्ट्स संघाने तर तृतीय क्रमांकासाठीचे पाच हजार एक रुपये ब्रोझ स्पोर्टस संघाने पटकाविले. या स्पर्धेत अनेक क्रिकेट संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक जय पाटील, उत्कृष्ट फलंदाज विनायक काकतकर, उत्कृष्ट गोलंदाज सुनील मुरकुटे, मालीकावीर लखन धामणेकर, सामनावीर लखन धामणेकर, उदयोन्मुख खेळाडू साहिल पाटील, शिस्तबद्ध संघ छावा स्पोर्ट्स अशी वैयक्तिक बक्षिसे खेळाडूनी मिळविली.
स्पर्धा उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्ष संजय पाटील होते. अर्जुन जांबोटकर, कलाप्पा (बबन) गुरव यांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन झाले होते. बक्षिसे व चषकांचे पूजन शांताराम पाटील, शिवाजी मुरकुटे, रेणुका नाईक, ईश्वर गुरव, आरती लोहार, मलव्वा कांबळे यांच्या हस्ते झाले. मोहन पाटील, काशिनाथ पाटील, जोतिबा बडसकर, विजय पाटील, एम. बी. गुरव, शैलश गुरव, विष्णू जांबोटकर, बाळाराम काकतकर, मल्लाप्पा पाटील, अर्जुन राजगोळकर, मारुती पाटील, विलास गुरव आदींच्या हस्ते विविध फोटो प्रतिमांचे पूजन करण्यात आले.









