कोल्हापूर: कोल्हापुरात 14 वर्षाच्या मुलीला एका मुस्लिम तरुणाने फूस लावून पळून नेल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याला पंधरा दिवस उलटूनही पोलीस शोध लावत नसल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेत. आज पोलीस प्रशासनाला जाब विचारण्यासाठी भाजपच्या आमदार नितेश राणे हे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जवळपास 300 हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली आहे. दरम्यान जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सैन्यात करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
कोल्हापूर शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर लव्ह जिहाद मधून हा प्रकार घडला असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनानी केलाय. या घटनेसंदर्भात मुलीच्या पालकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या मुद्यालाच घेवून आज भाजप आमदार नितेश राणे हे कोल्हापूरात येणार आहेत. सद्या ते जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या समोर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमा झाले आहेत..
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









